आधारभुत किंमतीत धान खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीला मिळाली मुदत वाढ. – ना.आशिष जैस्वाल यांच्या मागणीला यश

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

आधारभुत किंमतीत धान खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीला मिळाली मुदत वाढ.
## ना. आशिष जैस्वाल यांच्या मागणीला यश
रामटेक दि. ३१-१२-२०२४
भंडारा,गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यात खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत किंमतीत धान खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शासनाने आता १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.पूर्वी ही तारीख १५ डिसे.२४ होती.ना. आशिष जैस्वाल यांनी ३० डिसेंबरला तारीख वाढवून देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना देवून मुदतवाढीची मागणी केली होती.मुदतवाढ मिळाल्याने ना.जयस्वाल यांच्या प्रयत्नांना यश आले.
१५ डिसेंबरची तारीख उलटून गेली तरीही बरेच शेतकरी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करायचे शिल्लक आहेत त्यामुळे आॅनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत होती.
लोकांची ही मागणी विचारात घेता ना.जयस्वाल यांनी ना.धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ करण्यासंबंधी पञ दिले.३१ डिसेंबरला राज्याचे उपसचीव राजश्री सारंग यांनी पणन मंडळाला पत्र देवून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत देत नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देत असल्याचा आदेश दिला.शेतकर्यांनी आता लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन ना.जयस्वाल यांनी केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
