नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मुख्याध्यापक नीलकंठ बरयेकर यांना माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आला भावपूर्ण निरोप – जनता टाइम्स न्यूज

मुख्याध्यापक नीलकंठ बरयेकर यांना माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आला भावपूर्ण निरोप

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मुख्याध्यापक नीलकंठ बरयेकर यांना माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आला भावपूर्ण निरोप

रामटेक तालुक्यातील पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी शाळेचे मुख्याध्यापक नीलकंठ बरयेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त, 2004-2005 मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन केले. मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक म्हणून नीलकंठ बरयेकर यांनी आपल्या 35 वर्ष 5 महिन्यांच्या दीर्घ सेवेत शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांनी पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी शाळेत 26 वर्ष 5 महिने सहाय्यक शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आणि 28 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या शिकवणीने असंख्य विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवला, ज्यामुळे आज ते विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

सेवानिवृत्ती समारंभात शाळेचे मुख्याध्यापक नीलकंठ बरयेकर, सहाय्यक शिक्षक तामखाने सर, ठवकर सर, गोरले सर, तडस सर, शिक्षिका यादव मॅडम, साव मॅडम, तसेच शाळेचे कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि विद्यमान विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी सरांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला आणि त्यांचे मार्गदर्शन त्यांच्या यशस्वीतेचे गमक असल्याचे नमूद केले. उपस्थितांनी सरांना शुभेच्छा देत पुढील जीवनात चांगले आरोग्य आणि आनंद मिळावा, अशी प्रार्थना केली.

कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांकडून सर्व उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी अल्पोआहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मुख्याध्यापक नीलकंठ बरयेकर यांच्या सेवानिवृत्तीने शाळेचा एक महत्त्वाचा अध्याय पूर्ण झाला आहे, मात्र त्यांचे योगदान विद्यार्थ्यांच्या जीवनात कायम स्मरणीय राहील.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed