नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न*  ———————————– *संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूरचा स्तुत्य उपक्रम* ———————————- *जनता टाइम्स जटा टीव्ही चैनल* – जनता टाइम्स न्यूज

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न*  ———————————– *संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूरचा स्तुत्य उपक्रम* ———————————- *जनता टाइम्स जटा टीव्ही चैनल*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न*

———————————–

*संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूरचा स्तुत्य उपक्रम*

———————————-

*जनता टाइम्स जटा टीव्ही चैनल

*भिवापूर प्रतिनिधी:- कु. संचिता दमके*

दिनांक 12 जानेवारी 2025

भिवापूर प्रतिनिधी:- तालुक्यातील संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर( तास )येथे युगपुरुष, कर्मयोगी, धर्मयोगी, हिंदुत्ववादी महान व्यक्तिमत्व, आजच्या तरुण पिढीचे आदर्श स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून आज दिनांक 12 जानेवारीला रोज रविवारी सकाळी 11 वाजे राष्ट्रीय युवा दिन निमित्त या महामानवाला मल्ह्यारपण करून तथा विनम्र अभिवादन करून उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम गणमान्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साह संपन्न झाला .

सदर उद्योजकता प्रेरणा दिन कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ मा. श्रीमती मनीषा हिमांशू चौधरी संचालक त्र्याफो रेडिएटर्स अँड टॅक्स प्रायव्हेट लिमिटेड उमरेड यांच्या शुभहस्ते मा. चंद्रशेखर राऊत, प्राचार्य संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर तास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .

यावेळी समस्त मान्यवरांनी धर्मयोगी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यारपन करून विनम्र अभिवादन केले .

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती मनीषा चौधरी यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी युवा विद्यार्थ्यांना “आजच्या तरुण कसा असावा याचा आदर्श ओजस्वी तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले कर्मयोगी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातून जीवनमूल्य घेतल्यास जीवनात यशस्वी होण्यास आपण सक्षम बनाल असल्याचे आपल्या मनोगत आतून प्रतिपादित केले .

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना मान्य. चंद्रशेखर राऊत म्हणाले की “जोपर्यंत तुमचे अंतिम लक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत सातत्यपूर्ण प्रयत्नांची झटपट खटाटोप केल्यास जगात तुमच्यासाठी काहीच शक्य नाही प्रत्येक गोष्ट शक्य होईल यासाठी तुम्ही जागे व्हा, उठा आणि ध्येय मार्गावर अविरत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले .

यावेळी विचार मंचावर विशेष निमंत्रित अतिथी मा. अजय गिरे , सीईओ ट्रफो रेडिएटर्स अँड टॅक्स प्रायव्हेट लिमिटेड उमरेड, मा.डॉक्टर किशोर गेडाम ,(आय टी आय दिल्ली ) भिवापूर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच सदर उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी कॉलेज मधील समस्त युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तथा विद्यार्थी- विद्यार्थिनींनी प्रामुख्याने आपली उपस्थिती दर्शवली होती .

यावेळी कॉलेजमधील प्राध्यापक वृंदांमध्ये रामटेके सर, बोरकर सर , डोकिरमारे सर, साईनाथ थेरे,माकोडे मॅडम ,भांडारपाल हरडे, संचिता दमके आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरकर सर ,प्रास्ताविक रामटेके सर तर आभार प्रदर्शन डोकिरमारे तथा बुटे सर यांनी मानले.

कार्यक्रमाचे आयोजन तथा संयोजन संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर चे सर्वसाधारण प्राचार्य मा. यु. सी. पवार सर यांनी केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed