नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , घरकुल लाभार्थ्यांना जप्तीच्या रेती साठ्यातून 5 ब्रास मोफत रेती द्या, प्रहार जिल्हाध्यक्षाची कलेक्टर कडे मागणी – जनता टाइम्स न्यूज

घरकुल लाभार्थ्यांना जप्तीच्या रेती साठ्यातून 5 ब्रास मोफत रेती द्या, प्रहार जिल्हाध्यक्षाची कलेक्टर कडे मागणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

घरकुल लाभार्थ्यांना जप्तीच्या रेती साठ्यातून 5 ब्रास मोफत रेती द्या, प्रहार जिल्हाध्यक्षाची कलेक्टर कडे मागणी.

 

महायुती सरकारने केली जनतेची फसवणूक घरकुलाचे दर वाढवण्या ऐवजी शासनाने केले दहा हजाराने कमी, महेंद्र भांडारकर यांचा आरोप.

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

गोंदिया :- मोदी आवास, रमाई आवास, शबरी आवास, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात येतो. महागाईचे, घर बांधकामचे साहित्याचे दर उंचीचे शिखर गाठत असताना शासनाने अनुदान वाढवन्या ऐवजी उलट दहा (10,000/-) रुपये कमी केले.

अश्यातच लाभार्थ्यांना रेतीचे घाट लिलाव नसल्याने, रेतीचे डेपो नसल्याने घरकुलाचे रेती मिळत नाही त्यामुळे घर बांधकाम रखडले आहेत. निधीही शासन वेळेवर लाभार्थ्यांना देत नाही.

गोंदिया जिल्ह्यात रेतीचे घाट आहेत पर्यावरनाची मंजुरी असलेल्या रेती घाटातून रेती किंवा अवैध पणे असलेल्या रेतीची महसूल विभागाने केलेल्या जप्तीच्या साठ्यातून घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हाखनिकर्म अधिकारी गोंदिया यांना केली आहे.

महायुती सरकारने घरकुलाचे अनुदान वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे ढोंग केले सरकार स्थापन झाली मात्र अनुदान वाढविण्याऐवजी कमी करण्यात आले विकासाच्या नावावर गोर गरीब जनतेची फसवणूक होत आहे. असा आरोपही प्रहारचे जिल्हाध्यक्ष भांडारकर यांनी केला आहे.

यापूर्वीही प्रहारने गोंदिया जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत रेती मिळवून दिली. आता त्याच धर्तीवर घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती घाट सुरु करुन देण्यात यावे किंवा जिल्ह्यातील जप्त केलेल्या रेती साठ्यातून तात्काळ मोफत रेती देण्यात यावी अशी मागणी प्रहारने केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed