इको क्लबच्या निसर्गदुतांनी बांधला वनराई बंधारा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*इको क्लबच्या निसर्गदुतांनी बांधला वनराई बंधारा*
राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक :- महाराष्ट्र शासनाच्या ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या धोरणानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (सामा. वनी.) पारशिवनी व राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, नवेगाव खैरी द्वारा संचालित राष्ट्रीय हरित सेना यांचे संयुक्त विद्यमाने (दि.१७) ला पेंच धरण परिसरात वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील वन्यजीवांना तसेच पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे.
गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी निसर्ग संरक्षण व संवर्धनाचे सातत्याने कार्य करणाऱ्या व बंधारा बांधून वन्यजीवांची काळजी वाहणाऱ्या निसर्गदुतांचे कौतुक केले. याप्रसंगी माजी उपसभापती चेतन देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चन्ने, हरित सेनेचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बंधारा निर्मितीच्या यशस्वीतेसाठी इको क्लबच्या ५० विद्यार्थ्यांनी तसेच शाळेतील समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाला वनपाल अनिल राठोड, शिक्षक शैलेंद्र देशमुख, वनरक्षक सूरज चोपडा, दिनेश ठाकरे, मनोहर शेंडे, वनमजूर गजानन ढोंगे, बाळा ढोके, खुशाल केळवदे, मंगेश केळवदे, महादेव सोमकुवर, संतोष नखाते, अभिजीत मैंद, मनीष राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
