चिमुर तालुक्यात अवैध दारूचा महापूर!पोलीस प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष :: शुभम मंडपे
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
सुनिल गेडाम मुख्य पत्रकार जनता टाइम्स
चिमुर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री, सट्टापट्टी व जुगार चालू आहे मात्र याकडे चिमुर च्या पोलीस प्रसासनाचे अजिबात लक्ष नाही चिमुर शहरात व खडसंगी, नेरी, जांभूळघाट, भिसी, आंबोली, शंकरपूर परिसरात अवैध दारुविक्री महापूर, जुगार व सट्टापट्टी होत असल्यामुळे चिमुर तालुक्यातील युवकांचे व विद्यार्थ्याचे खूप मोठे नुकसान होत आहे त्यामुळे अवैध दारुविक्री,सट्टापट्टी व जुगार तात्काळ बंद करावी याची मागणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ मंडपे यांनी केली आहे,चीमुर तालुका ही क्रांतीभूमी असून वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे मात्र या भूमितील युवक व विद्यार्थी हा व्यसनाधीन होत आहे… खेडोपाड्यात गावा -गावात अवैध दारुविक्री, सट्टापट्टी, जुगार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र याकडे चिमुर च्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचे व पोलीस निरीक्षकांचे अजिबात लक्ष नाही अशी परिस्तिती दिसत आहे.. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ मंडपे यांनी तात्काळ चिमुर तालुक्यातील व शहरातील अवैध दारुविक्री, सट्टापट्टी व जुगार तात्काळ बंद करावी अन्यथा पोलीस कार्यालय चिमुर समोर युवकांच्या वतीने भव्य आंदोलन करू असा इशारा दिला आहे
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space