एन.एच.ए.आय. चे ‘ फुट ओव्हर ब्रिज ‘ ठरतेय शोभेची वास्तु
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*एन.एच.ए.आय. चे ‘ फुट ओव्हर ब्रिज ‘ ठरतेय शोभेची वास्तु*
– करोडो रुपयांचा खर्च ठरला व्यर्थ
– रस्ता ओलांडूनच लोकांची रहदारी
– ब्रिज च्या पायऱ्या चढून पाय दुखवण्याचा खटाटोप करण्यास लोकांचा नकार
– ब्रिजवर असामाजीक तत्वांचा वावर
*रामटेक* -:
नागपुर – जबलपुर महामार्ग मस्त गुळगुळीत बनला. परिणामस्वरूप वाहनांचे वेगही वाढले. मात्र यातच भर पडली ती अपघातांची. या महामार्गावर विशेषतः गाव वस्तीच्या स्थळी अपघातांचे प्रमाण वाढल्याने लोकांनी चक्काजाम आंदोलन सारखे शस्त्र काढून मोठा जनआक्रोश केला. तेव्हा एनएचएआय ने पर्याय काढत नागपुर – जबलपुर महामार्गावर तालुक्यातील आमडी ला एक तर देवलापार येथे दोन फुट ओव्हर ब्रिज करोडो रुपये खर्चुन उभारले. मात्र ब्रिज च्या पायऱ्या चढुन पाय दुखत असल्याने तथा त्यात अधिकचा वेळ जात असल्याने लोकांनी शेवटी रहदारीचा सुरु रस्ता ओलांडूनच पलीकडे जाने पसंत केल्याने सध्यास्थितीत देवलापार येथील शाळेजवळील वगळता इतर दोन फुट ओव्हर ब्रिज फक्त शोभेची वास्तु ठरत असल्याचे वास्तव चित्र आहे. तेव्हा यात शासनाचा करोडो रुपयांचा खर्च व्यर्थ गेल्याचे दिसून येत आहे.
सदर प्रकारात शासनाची तथा एनएचएआय ची चुक मुळीत म्हणता येणार नाही. वारंवार काही निवडक अपघात स्थळी अपघात होत असल्याने लोकांनी जनआक्रोश करीत चक्का जाम सारख्या घडामोडी केल्या होत्या. यात लोकांच्या सोबतीला स्थानिक काही नेतेही उतरले होते. शेवटी सततच्या तक्रारी नकोच म्हणून शासन झुकले व एनएचएआय मार्फत करोडो रुपये खर्च करून चर्चीत अपघात स्थळ आमडी येथे एक तर देवलापार येथे दोन फुट ओव्हर ब्रिज उभारण्यात आले. हा सर्व खटाटोप लोकांमुळेच झाला अन् याच लोकांनी आता फुट ओव्हर ब्रिजकडे पाठ फिरवली आहे. ते आता सर्रास चालु रस्ता ओलांडुन पलीकडे जातांना दिसुन येत आहेत. तिनही फुट ओव्हर ब्रिज चे निरीक्षण केले असता देवलापार येथील शाळेजवळील ब्रिजवरून शाळकरी मुले जात असतात. मात्र येथीलच दुसरा ब्रिज तथा आमडी येथील ब्रिज चा लोकांकडुन वापर केल्या जात नसल्याचे वास्तव आहे. आमडी येथील काही महिलांनी तर ‘ कशाला हा उभा केला येथे, पायऱ्या चढुन पाय दुखतात व दम सुद्धा भरून येतो ‘ अशा पद्धतीने बोलून दाखविले आहे. कदाचित आमडी तथा देवलापार येथे या फुट ओव्हर ब्रिज चे बुजगावणे उभारण्यापेक्षा ओव्हर ब्रिज च उभारणे सोयीस्कर राहीले असते असे म्हणने वावगे ठरणार नाही.
*ब्रिजवर असामजिक तत्वांचा बिनधास्त वावर*
रस्ता ओलांडताना अपघात होवु नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शासनाने लोकांसाठी हे फुट ओव्हर ब्रिज उभारले तर खरे मात्र यावर लोकांपेक्षा असामाजिक तत्वांचा वावरच ज्यास्त होतांना दिसुन येत आहे. ब्रिज उंच असल्याने ब्रिजवरील विशेषतः बसलेला व्यक्ती सहसा कुणाच्या दृष्टीपटलांना दिसुन येत नाही आणि नेमका याच बाबीचा गैरफायदा घेत काही प्रेमीयुगुल या फुट ओव्हर ब्रिजवर बिनधास्त बसुन असलेले दिसुन येतात. परिणामस्वरूप परिवार सोबत घेऊन जात असलेल्यांना खाली मान टाकायची वेळ येत असते तथा शाळकरी विद्यार्थ्यांवर या प्रकारामुळे वाईट परिणाम होवु शकतात हे वेगळे सांगायला नको.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space