नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , एक पुष्पमाला वंदन बा भीमाला*         *एक अभिनव उपक्रम* ——————————————- *उमरेड शहरात मानवतावादी बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद* – जनता टाइम्स न्यूज

एक पुष्पमाला वंदन बा भीमाला*         *एक अभिनव उपक्रम* ——————————————- *उमरेड शहरात मानवतावादी बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*एक पुष्पमाला वंदन बा भीमाला*

*एक अभिनव उपक्रम*

——————————————-

  1. *उमरेड शहरात मानवतावादी बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*दिनांक 19 जानेवारी 2025*

*मुख्य पत्रकार महाराष्ट्र:- सौ. अर्चना लोखंडे*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

*इन्साफ चाहता है! इंडिया*

नागपूर प्रतिनिधी:- या अभियान अंर्गत उमरेड शहरात मागील ४० हप्त्या पासून दर रवीवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क संविधान चौक उमरेड येथे सकाळी १०-३० वा. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्ल्यारपण करून भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील मार्गाचे पाली आणि मराठी मध्ये उपस्थित बालक आणि इतर मान्यवर यांच्या कडून पठण करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडावे याकरिता प्रयत्न केले जातात त्यानंतर उपस्थित मार्गदर्शक यांचे कडून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले विचारांवरती मार्गदर्शन केल्या जाते

हा कार्यक्रम नुसता अभिवादनाचा नसून एक बालसंस्कार शिबिर या मार्गाने राबवल्या जातो हा कार्यक्रम घेत असताना मध्ये येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी दिवसाला त्यांना सुद्धा अभिवादन करून त्यांचे विचार सुद्धा बालमनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो,आज शाळा महाविद्यालय यांच्या मधून मिळणाऱ्या शिक्षणातून महापुरुषांचे विचार हळूहळू नष्ट करण्यात येत आहेत आणि येणाऱ्या पिढीला महापुरुषांबद्दल आणी त्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळावी व त्यातून प्रेरणा घेऊन आदर्श व्यक्तिमत्व समाजात निर्माण व्हावे याच उद्देशाने हा कार्यक्रम निरंतर येथे राबविल्या जातो अशी माहिती या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक वीरेंद्र मेश्राम यांनी दिली

या कार्यक्रमांमध्ये दर रविवारी सातत्याने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल उमरेड शाखा सर्व पदाधिकारी सातत्याने उपस्थित असतात यामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा उमरेड अध्यक्ष माननीय शरद आटे, जितेंद्र नगरारे, विजयानंद सावळे , अश्विन बारसागडे, राजू गजभिये,निरंजन गायकवाड, बी एस भुरे, प्रतीक मेंढे, अभिलाष मून, मैसकरजी, तसेच महिलांमध्ये दिपाली ताई मेंढे, किरण ताई कोसे, करिष्मा ताई पाटील, प्रणिता गायकवाड, पूजा ताई नगरारे तसेच समता सैनिक दल शाखा उमरेड चे मा.संजय मनवर,रोशन इंगोले, पप्पू संकाडे,उज्वल कोसे,सरोदे तसेच इतर मान्यवर न चुकता हजेरी लावतात

या कार्यक्रमांमध्ये मुलांना बाबासाहेबांच्या विचारांवरती तसेच बुद्धांच्या विचारांवरती सतत मार्गदर्शन करण्यामध्ये संजय मनवर, विजयानंद साळवे आणि वीरेंद्र मेश्राम यांची महत्त्वाची भूमिका असते तसेच या छोट्या मुलांमधील अभिनय गायन अशा गुणांना वाव देण्याकरिता अश्विन बारसागळे सर हे सुद्धा सतत प्रयत्नशील असतात

एक पुष्पा माला वंदन बा भीमाला अभियानाच्या संयोजक टीमकडून उमरेड मधील नागरिकांना असे आवाहन करण्यात आले की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात आपल्या पाल्यांना घेऊन उपस्थित रहावे आणि या उपक्रमाचा त्यांना सुद्धा लाभ घेता यावा व त्यांचा सुद्धा वैचारिक विकास व्हावा असे आवाहन करण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now