दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा पर्यवेक्षक, केंद्र संचालक ,कर्मचारी यांना दिलासा—–शिक्षण विभागा ची माघार* —————————————- *अखेर शिक्षण विभागाची तणाव रहित कापीमुक्त अभियानाला हिरवी झेंडी* —————————————– *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा पर्यवेक्षक, केंद्र संचालक ,कर्मचारी यांना दिलासा—–शिक्षण विभागा ची माघार*
—————————————-
*अखेर शिक्षण विभागाची तणाव रहित कापीमुक्त अभियानाला हिरवी झेंडी*
—————————————–
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*इंसाफ चाहता है! इंडिया*
*दिनांक 30 जानेवारी 2025*
*मुख्य पत्रकार महाराष्ट्र:- सौ अर्चना लोखंडे*
नागपूर प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी फेब्रुवारी- मार्च 2025 ची दहावी आणि बारावीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राचा स्वरूप तथा कार्यप्रणाली संदर्भात 17 जानेवारीला घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात आला असून त्यात काहीसा लवचिक बदल करून काही निवडक गैरमार्ग आढळलेल्या परीक्षा केंद्र वगळता उर्वरित सर्व दहावी-बारावी परीक्षा केंद्रावरची कार्यप्रणाली पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण विभागाने घेतल्याने शिक्षक संघटना तथा शाळा संचालकांचा दबाव तंत्राला यश मिळाल्याने शिक्षक पालक विद्यार्थी वर्गात समाधान व्यक्त केला जात आहे.
जाहीर झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे दहावीची शाळांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 तर बारावीची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजी नगर ,मुंबई ,कोल्हापूर ,अमरावती ,नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळामार्फत आयोजित केलेली आहे.
मात्र कापीमुक्त अभियानाच्या गोडस नावाखाली शिक्षण विभागाने दिनांक 17 जानेवारी ला एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा केंद्राची कार्यप्रणाली बदलून शिक्षक- पालक- विद्यार्थी वर्गाची झोपच उडवून दिल्याने सरळ सदर परिपत्रकाद्वारे जाहीर केलेला निर्णय मागे घेण्यासाठी विविध शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून सदर निर्णयाचा निषेध करत पारंपारिक पद्धतीने परीक्षा केंद्राची कार्यप्रणाली लागू करण्याची मागणी केल्याने शिक्षण विभागाने सावधपणे भूमिका घेत निर्णय मागे घेऊन त्यास काहीसा लवचिक बदल सुचविल्याने शालेय शिक्षण क्षेत्रात दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
मा. लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटना व संस्था चालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या असल्याने उपरोक्त निर्णयात अंशतः बदल करण्यात येत असून फेब्रुवारी- मार्च 2025 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी )व माध्यमिक प्रमाणपत्र( इ. 10वी) परीक्षा निकोप तनावरहित व पारदर्शक, कापीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे .
कोरोना काळातील सण 2021 व 2022 या दोन परीक्षा वगळता मागील पाच वर्षाच्या फेब्रुवारी -मार्च 2018, 2019 ,2020 ,2023 व 2024 या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैर मार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशाच परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेचे संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर अन्य शाळा उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार असून गैरमार्गाची प्रकरणी आढळून येणाऱ्या परीक्षा केंद्रामध्ये अशा केंद्राची मान्यता पुढील वर्षीपासून कायमचे रद्द करण्याबाबतचे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सुचित केलेले आहे.
तसेच मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात दहावीची व बारावीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा असणार आहे तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक सदस्य सचिव दक्षता समिती विभागीय मंडळ यांनी माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठक पथक कार्यरत राहणार असल्याचे कार्यवाही करण्याबाबत सर्व विभागीय व सर्व संबंधितांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे .
उपरोक्त निर्णयाने परीक्षा कालावधीत सावळा गोंधळ न होता पारदर्शक, सुरळीत व निकोप वातावरणात परीक्षा पार पडणार असल्याचे शिक्षण क्षेत्रात क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space