नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा पांजराच्या बाल आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमाने गावाला आले जत्रेचे रूप. – जनता टाइम्स न्यूज

जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा पांजराच्या बाल आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमाने गावाला आले जत्रेचे रूप.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा पांजराच्या बाल आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमाने गावाला आले जत्रेचे रूप.

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

तिरोडा :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांजरा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 3 दिवसाचे कार्यक्रम आयोजित केले होते 24 तारखेला जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा पांजरा येथे बाल आनंद मेळाव्याने शाळेला यात्रेचे स्वरूप आले होते. 31 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले त्यात गावातील असंख्य महिला पुरुष बाल गोपालांनी स्टॉलवर मुलांद्वारे लावलेल्या निरनिराळ्या पकवानांच्या सुगंधाने, देखाव्याने अनेकांच्या तोंडाला पाणी आले त्यात बालगोपालांनी एकूण 5678/- रुपयाचा नगद आर्थिक व्यवहार केला.

25 व 26 जानेवारीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्राम पंचायतच्या भव्य पटांगनावर आयोजिलेल्या संस्कृतीक कार्यक्रमात जि.प. शाळा पांजराने गावाचे केंद्रात, तालुक्यात, जिल्हास्तरावर नेतृत्व केलेले नृत्य सादर केले, त्याच बरोबर एकाहून एक मनमोहक धडाकेबाज नृत्य कलेचे प्रदर्शन यावेळी जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्राम पंचायत च्या भव्य पटांगणावर सादर केले.

जिल्ह्यात यशप्राप्ती जरी मिळाली नसेल तरी गावात तालुक्यात जिल्हाभर सर्वत्र पांजरा गावाच्या त्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेची झलक जन मुखात चर्चेत आहे.

26 जानेवारी प्रजास्त्ताकदिनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध सामूहिक, एकल प्रस्तुत नृत्यांनी समस्त गावकऱ्यांचे मन जिंकले. त्यात विशेष म्हणजे अटल सांस्कृतिक क्रीडा महोत्सवात जिल्हा स्तरावर सांस्कृतिक नृत्यात यंत्रनेने होतकरू विद्यार्थ्यांना वाव न दिल्याने पालकात, परिसरात नाराजीचे सूर वाहत आहेत.

सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रणोतीताई महेंद्र नंदागवळी, गावचे सरपंच सौ. शारदाताई राजेंद्र चामट, उपसरपंच सुभाषजी चव्हाण, ग्रामसेवक हाडगे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांजराचे मुख्याद्यापक हाके सर, वासनिक सर, शहारे सर, बोन्दरे मॅडम, शा. व्य.स. उपाध्यक्ष हिराकुमार गोमासे सर्व शा. व्य.स सर्व सदस्यगण माजी सरपंच राजेंद्रजी चामट, महेशजी गाढवे ग्रा. प. सदस्य. विजयजी उपासे, सर्व ग्रा. प. सदस्य. तंटामुक्त समितेचे अध्यक्ष रेवानंदजी वाकुळकर, महिला बचत गट समस्त पालकवर्ग गावकारी महिला भगिनी, बालगोपाल यांनी जि. प. शाळा पांजराने आयोजित केलेल्या 3 दिवशीय कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now