रामटेक येथे महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*रामटेक येथे महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन*
– सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्थेच्या २२ सदस्यांचा सहभाग
*रामटेक* -:
शहरात नुकतेच महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्थेच्या २२ सदस्यांनी आवर्जुन सहभाग घेतला होता. सर्व धावकांनी अनुक्रमे वेगवेगळ्या गटाप्रमाणे २१,१० आणि ५ की.मी. अंतर धावून यशस्वीपणे पूर्ण केले. विशेष म्हणजे यात महिला धावकांनी सुद्धा आपली कामगिरी बजावली व या संस्थेच्या सदस्यांनी भाग घेतलेली ही तिसरी मॅरेथॉन होती.
शहरात सकाळी शारीरिक व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढावी जेणेकरून उत्तम दिनचर्येचा पुरस्कार करून जीवनशैलीवर आधारित आजार कमी करता येईल. योग आणि प्राणायाम करून मानसिक ताण कमी होवु शकतो या हेतुन या महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे आयोजकांनी सांगितले. दरम्यान धावकांनी स्पर्धेचे आयोजन अतिशय सुंदर असल्याचे सांगितले. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, ओ आर एस ची, फळांची व्यवस्था केली होती. दिशादर्शक फलक आणि स्वयंसेवक यांनी उत्तम प्रकारे मार्ग व्यवस्थापन केले होते. प्रत्येक ठराविक अंतरानंतर वाद्य आणि लेझिम घेऊन नाचणारे संच धावकांना प्रोत्साहित करीत होते. वाहनांची रहदारी धावण्याच्या मार्गात अडथळा करू नये म्हणून चौकाचौकातून दुसरीकडे वळविण्यात आली होती. लांब जटाधारी शंकराची वेशभूषा करू धावणारा धावक आणि दोन मुली साडी घालून आणि शृंगार करून धावतांनाचे दृश्य मनाला प्रफुल्लित करणारे होते. वेगवेगळ्या अंतरासाठी वेगवेगळे वेळेचे पेसर धावकांची गती सातत्य ठेवत होती. मॅरॅथॉन सुरू करतांना स्टार्टिंग पॉइंट ला दोन्ही बाजूने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मैदानात झुंबा नृत्य आणि डीजेच्या तालावर नाचणे ताण कमी करणारे होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
