समर्थ प्राथमिक शाळेत क्रिडा स्पर्धेचे आयोजन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*समर्थ प्राथमिक शाळेत क्रिडा स्पर्धेचे आयोजन*
*रामटेक* -:
शहरातील समर्थ प्राथमिक शाळेत नुकतेच दि. १ फेब्रुवारीला क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान वर्ग १ ते ४ मधील विद्यार्थी विद्यार्थीनींनी यात आवर्जुन सहभाग घेत क्रमांक पटकावला.
मुख्याध्यापिका कविता जंजाळ यांनी सदर क्रिडा स्पर्धा घेण्यामागचे मुख्य कारण स्पष्ट करतांना सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढावी आणि त्यांना स्वतःची कौशल्ये सिद्ध करण्याची संधी मिळावी, शरीर तंदुरुस्त राहुन आत्मविश्वास वाढतो आणि टीमवर्क तसेच क्रीडासंस्कृती विकसित होत असल्याचे सांगितले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, शिस्त आणि खेळातील नवे तंत्र शिकण्याची संधी मिळते असेही त्या म्हणाल्या. या स्पर्धेचे विधिवत उद्धाटन समर्थ माध्यमिक विभागाच्या विभागप्रमुख साै.विद्या किंमतकर मँडम व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका साै.कविता जाैजाळ मँडम यांचा हस्ते करण्यात आले होते. स्पर्ध्येत कबड्डी, लंगडी, रस्सीखेच, पोत्याची रेस, लांब उडी, धावणे, लिंबु चमचा आदी. स्पर्धांचा समावेश होता. याप्रसंगी शाळेतिल सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित हाेते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
