उडान प्रोजेक्ट तर्फे नांदच्या सरपंच शितल राजूरकर यांचा सत्कार* ————————————- *जनता टाइम्स जटा टीवी चैनल* *इन्साफ चाहता है !इंडिया*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*उडान प्रोजेक्ट तर्फे नांदच्या सरपंच शितल राजूरकर यांचा सत्कार*
————————————-
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*इन्साफ चाहता है !इंडिया
*मुख्य पत्रकार महाराष्ट्र:- सौ. अर्चना लोखंडे*
*दिनांक 7 फरवरी 2025*
नागपूर प्रतिनिधी:-
उडान प्रोजेक्ट नागपूर तर्फे तीन दिवसीय आयोजित बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ मेंटल हेल्थ इन इंडिया या कॉन्फरन्सचे आयोजन द सेवन हॉटेल, नागपूर येथे करण्यात आले होते. दिनांक 28 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये भारतातील विविध ठिकाणी मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाल्या होत्या. नागपूर जिल्ह्यामधील उडान प्रकल्पाच्या वतीने मानसिक आरोग्यावर कार्य केले जात आहे. मानसिक आरोग्यावर भिवापूर तालुक्यातील नांद या गावात श्रीमती सरपंच शितल राजूरकर यांनी उत्कृष्ट कार्य केले होते. त्यांच्या कार्याची दखल उडान प्रकल्पाच्या वतीने या कॉन्फरन्समध्ये घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. इंदिरा फाउंडेशन अमेरिकाच्या मानसिक आरोग्य प्रमुख डॉ. तसनीम राजा, उडान प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख डॉ. अभिषेक मामर्डे, मानसोपचार तज्ञ डॉ. सय्यद साकिब व उडान प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. प्रवीण काकडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत नाद येथील सरपंच श्रीमती शितल राजूरकर यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
इंदिरा फाउंडेशन व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत उडान प्रोजेक्ट तर्फे मानसिक आरोग्यावर महत्वपूर्ण काम सुरू आहे. मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, हे ओळखून नांदच्या सरपंच यांनी मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याकरिता वारंवार पाठपुरावा केला. जुलै 2024 मध्ये ग्रामपंचायत नांद तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र, नांद येथे मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये 49 मानसिक रुग्णांची नोंद झाली. मानसिक आरोग्याच्या संदर्भात श्रीमती शितल राजूरकर ह्या उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे. या कार्यामध्ये त्यांना श्री. विराग वाकडे, तालुका समन्वयक ( मानसिक आरोग्य ) यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व गावकरी तसेच तालुक्यातील सर्व सरपंच त्यांचे अभिनंदन करीत आहेत. नांद ग्रामपंचायतचे ग्राम सचिव श्री. भारत मेश्राम, उपसरपंच श्री. मोहन धारणे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रमोद बारेकर यांनी श्रीमती शितल राजूरकर यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
