गहुतलाव मोक्षधामात अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांची पाण्यासाठी भटकंती

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*गहुतलाव मोक्षधामात अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांची पाण्यासाठी भटकंती*
– अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांची पाण्यासाठी भटकंती
– न.प. प्रशाषणाचे दुर्लक्ष
– मुख्याधिकाऱ्यांनी घेतली दखल, दिले संबंधितांना आदेश
*रामटेक* -:
गहु तलाव जवळ असलेले मोक्षधाम सध्या विशेषतः पाण्याच्या समस्येनी ग्रासलेले आहे. मोक्षधामात पाणि असने गरजेचे असुन त्याविना अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना अडचण निर्माण होत असते. सध्यास्थितीत गहुतलाव जवळील मोक्षधामात पाण्याचा शुकशुकाट असुन येथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
विशेषतः बसस्थानक तथा लागुनच असलेल्या शितलवाडी परीसरातील लोकांसाठी अंबाळा येथील मोक्षधामाच्या तुलनेत गहु तलाव जवळील मोक्षधाम हे जवळचे असल्याने या परीसरातील नागरीक विशेषतः गहु तलाव जवळीलच मोक्षधामात अंत्यसंस्कारासाठी येत असतात. नुकतेच बांधकाम झालेल्या या मोक्षधामात महत्वाची बाब असलेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल ही बाब बहुतांश लोकांना माहिती नसते मात्र नंतर त्यांच्यापुढे पाण्याअभावी अडचणी निर्माण होत असतात. नविनच बनलेल्या या मोक्षधामात सध्यास्थितीत एक हॅन्डपंप आहे मात्र तोही नादुरुस्त आहे. प्रसाधनगृह उभारण्यात आलेले आहे तथा त्यावर पाण्याची टाकी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे मात्र पाईप ला लावण्यात आलेल्या नळांना तोट्याच नसुन पाण्याची इतर काही व्यवस्था येथे नाही. तोट्या लावल्या होत्या पण त्या चोरट्यांनी चोरून नेल्या असे नगर परिषदेतील एका अभियंत्यांने सांगितले. तेव्हा प्रसाधन गृह फक्त नावाचेच आहे. ऐन वेळेवर येथे कुणाला शौचासाठी जावे लागले तर त्याची किती पंचायत होईल याची कल्पना न केलेलीच बरी. एकंदरीत पाण्याच्या समस्येने या मोक्षधामाला ग्रासलेले आहे. याबाबद रामटेक नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन लुंगे यांच्यापुढे देशोन्नती तर्फे सदर समस्या मांडली असता त्यांनी लगेच दखल घेत स्वच्छता विभागाच्या अभियंत्यांना सदर मोक्षधामाची पाहणी करून समस्येचे निवारण करण्याचे तथा नगर परिषदेचा एक कर्मचारी तेथील कामी लावण्याचे आदेश दिले.
बॉक्स
*अन् ग्लासभर पाण्यानेच करावी लागली आंघोळ*
शितलवाडी ( परसोडा ) येथील रहीवाशी असलेल्या एका कुटुंबामधील एक महिला मरण पावली. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गहुतलाव जवळील याच मोक्षधामात नेण्यात आला. यावेळी सदर मोक्षधामात पाण्याचा शुकशुकाट आहे अशी पुसटशीही कल्पना परिवाराला नव्हती. मोक्षधामात पोहोचल्यावर येथे अग्नी देण्यात आली. दरम्यान यावेळी मृतक महिलेच्या मुलाचे मुंडन करण्यात आले व नंतर आंघोळ करावी यासाठी पाण्याचा शोध घेणे सुरु झाले. प्रसाधन गृहात जावुन पहाले तर ना तेथील नळांना तोट्या होत्या ना पाण्याची इतर काही व्यवस्था. तिकडे एका कोपऱ्यात हॅन्डपंप दिसले. पाणि मिळेल अशा आशा पल्लवित झाल्या मात्र हॅन्डपंप हालवुन पाहिले असता ते सुद्धा नादुरूस्त होते. शेवटी हताश होवुन पिण्यासाठी आणलेल्या पाण्याच्या कॅनचे एक ग्लास पाणि अंगावर ओतुन त्या इसमाला आंघोळ करावी लागली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
