अज्ञात वाहनाने बिबट्याला उडविले

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*अज्ञात वाहनाने बिबट्याला उडविले*
– गंभीर जखमी बिबट्याचा उपचारार्थ नेतांना मृत्यु
– राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील घटना
*रामटेक* -:
रामटेक वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजा कांद्री येथे राष्ट्रीय महामार्गावर एक नर बिबट्या, वय अंदाजे ५ ते ६ वर्षे, अज्ञात वाहनाच्या धडकेचा शिकार झाला. जखमी अवस्थेत तो महामार्गाच्या कडेला पडला होता. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ए बी भगत आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तातडीने बिबट्याला गरजू उपचारासाठी नागपूर येथे नेण्याची व्यवस्था केली. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर वरीष्ठ अधिकारी श्री. प्रभुनाथ शुक्ल उपवनसंरक्षक नागपूर, श्री. आर एम घाडगे एसीएफ रामटेक यांना माहिती देण्यात आली. मृत बिबट्याला अंबाळा नर्सरी, रामटेक येथे नेण्यात आले. तेथे एनटीसीए च्या मार्गदर्शनानुसार उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी एसीएफ श्री. आर एम घाडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी रामटेक श्री. अनिल भगत, श्री. अविनाश लोंढे मानद वन्यजीव रक्षक, श्री. मिलिंद पंचभाई एनटीसीए प्रतिनिधी, श्री. एम. एल. गोडीमेश्राम क्षेत्रसहायक मनसर, श्री. बी. एन. गोमासे क्षेत्रसहायक, कु. दिपाली नाहे वनरक्षक, श्री. योगेश अंबाझीरे वनरक्षक, श्री. श्रावण अडमाची वनरक्षक, डॉ. बबीता मेश्राम, डॉ. पूजा जंगले आणि डॉ. राजेश कूलसुंगे हे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थीत होते. यावेळी बिबट्याचे दहन करण्यात आले. अज्ञात वाहनाविरोधात वन गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास रामटेकचे वनपरीक्षेत्र अधिकारी ए. बी. भगत हे करीत आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
