चिमुकल्यांच्या नृत्यकलेसह शिक्षकांचे नियोजन कौतुकास्पद – किंमतकर

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*चिमुकल्यांच्या नृत्यकलेसह शिक्षकांचे नियोजन कौतुकास्पद – किंमतकर*
– समर्थ प्रा. शाळेत ‘मुलांची दुनिया – स्नेहसंमेलन २०२४- २५’ चे थाटात आयोजन
– चिमुकल्यांची नृत्यकला पाहुन पालकही भारावले
– ‘ रामजिकी निकली सवारी ‘ नृत्याने वेधले लक्ष
*रामटेक* -:
शहरातील चर्चीत समर्थ प्राथमिक शाळेत नुकतेच दि. ७ फेब्रुवारीला वार्षिक स्नेहसंमेलन शाळेतिल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी सभागृहाची सजावट तथा चिमुकल्यांचे चित्तवेधक नृत्य पाहुण पालकांसह कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुनेही भारावुन गेले. दरम्यान यावेळी समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव ऋषीकेश किंमतकर यांनी आपल्या भाषणात ‘ चिमुकल्यांच्या नृत्यासह शिक्षकांचे नियोजनही कौतुकास्पद ‘ असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री. समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रसाद किंमतकर, प्रमुख पाहुणे म्हणुन उपाध्यक्षा श्रीमती कुसुमताई किंमतकर, सचिव श्री ऋषिकेश किंमतकर , शिक्षण विस्तार अधिकारी शालिनी रामटेके, समर्थ हायस्कुल व ज्यु.काँलेज च्या प्राचार्या साै.ममता लाेखंडे मँडम, समर्थ कॉन्व्हेंट व ज्यु. कॉलेज च्या प्राचार्या कु.रेणुका घाेष मँडम तथा विशेष आमंत्रित पाहुणे म्हणुन माजी नगरसेवक सुमित काेठारी, राजेश किंमतकर व पत्रकार पंकज बावनकर हे प्रामुख्याने उपस्थित हाेते.
सर्व अतिथी यांचा हस्ते दिपप्रज्वल्लीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका साै.कविता जाैजाळ मँडम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातुन शाळेतील विविध उपक्रमाची माहिती दिली.शाळेला नेहमीच मदत करणारे माजी नगरसेवक सुमित काेठारी व राजेश किंमतकर तथा पत्रकार पंकज बावनकर यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुमित काेठारी यांच्या तर्फे या प्रसंगी शाळेला ३० शालेय गणवेश व राजेश किंमतकर यांच्या तर्फे शाळेला २ ग्रीन मँट भेट म्हणुन देण्यात आल्या. या स्नेहसंमेलनामध्ये एकुण २० नृत्य व नाटकांचे उकृष्ट सादरीकरण करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व नृत्यांचे व नाटकांचे काेरियाेग्राफर शाळेतिल शिक्षकच होते. कारण चिमुकल्यांना एखादी कला किंवा नृत्य शिकवणे ही जणु तारेवरची कसरतच असते मात्र शिक्षकांनी अल्पावधीत मुलांना तयार करून स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी सक्षम केले. यासाठी पाहुणे मंडळीसाठी येथील शिक्षक कौतुकास्पद ठरले. उकृष्ट रंगमंच सजावट, अप्रतिम डेकाेरेशन, कार्यक्रमाचे उकृष्ट आयाेजन व केलेले नियाेजन डाेळ्यांचे पारणे फेरणारे हाेते. नाटक, नाच, गाणी यांचा सराव, रंगभूषा, वेशभूषा ,रंगमंचावरील मांडणी याच्या तयारीत विद्यार्थी व शिक्षक गेल्या आठवड्याभरापासुन तयारिला लागलेले हाेते. संमेलनाच्या सरावाच्या वेळेस शिक्षकांची दमछाक उडवणारी चिमुकली मुले संमेलनाच्या दिवशी मात्र रंगमंचावर आत्मविश्वासाने आणि सहजतेने वावरताना दिसली हे येथे उल्लेखनिय.
*बॉक्स*
‘ रामजीकी निकली सवारी ‘ नृत्याने वेधले लक्ष
संमेलनात ‘ रामजीकी निकली सवारी ‘ या नृत्याने पाहुणेमंडळींसह प्रेक्षक म्हणुन उपस्थित असलेल्या पालकांचेही लक्ष वेधले होते. या नृत्यातिल राम,लक्ष्मण,सिता, हनुमान व ईतर वानरसेना यांना पाहुन प्रेक्षकही भारावुन गेले. नाटक, नाच, गाण्यातून मुलांच्या दुनियेत फिरवून आणले. प्रेक्षकही या प्रवासात आपले मोठेपण विसरून लहान झालेले दिसून आले. या कार्यक्रमातील नृत्य,नाटकांचे सादरीकरण तथा त्यांची आकर्षक वेशभुषा यावर प्रेक्षकांनकडुन एकुण सहा हजार रुपयांचे बक्षिस प्राप्त झाले. एकही चुक न होता संपूर्ण संमेलन सुयोग्यरित्या पार पडल्याने उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.
*पालकांचे अभिप्राय*
१ – स्नेहसंमेलनाचे सादरीकरण अत्यंत उत्कृष्ट होते, नियोजनबद्ध, शिस्तबद्ध अशी स्नेहसंमेलनाची आखणी होती, स्नेहसंमेलन वेळेत सुरू होऊन वेळेत संपले त्यामुळे पालकांना तसेच विद्यार्थ्यांना कुठेही कंटाळा जाणवला नाही, विद्यार्थ्यांना भारतिय संस्कृतिची ओळख व्हावी असे नृत्यप्रकार होते, प्रत्येक विद्यार्थ्यावर अपार मेहनत घेतली गेलीय हे दिसून आले,पालकांना कुठलाही भुर्दंड न पाडता अत्यंत सुंदर असे स्नेहसंमेलन प्रत्येक शाळेत झालेच पाहिजे. स्नेहसंमेलन बघून राजवीला मराठी शाळेत प्रवेश घेण्याचा आमचा निर्णय कुठेही चुकीचा न्हवता असे आमचे मत आहे.
-साेनकलाल बेठेकर
२ – हे सगळं पाहताना स्वतःच्या बालपणात एक फेरफटका मारून आले. त्या तिन तासात आपल्या मुलांना स्टेजवर सादरीकरण करताना बघण्याचा आनंद तर मिळालाच त्याचबरोबर मुलांनी , शिक्षकांनी, शाळेने सगळ्यांनीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्हाला आमच्या बालपणाची सफर घडवली.
-काेमल बर्वे

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
