नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , खबरदार कापी बहाद्दरांनो*…….. *गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई होणार*  ——————————————- *संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन द्वारे होणार परीक्षण* ——————————————– *जनता टाइम्स जनता टीव्ही चॅनल*  – जनता टाइम्स न्यूज

खबरदार कापी बहाद्दरांनो*…….. *गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई होणार*  ——————————————- *संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन द्वारे होणार परीक्षण* ——————————————– *जनता टाइम्स जनता टीव्ही चॅनल* 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*खबरदार कापी बहाद्दरांनो*……..

*गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई होणार*

——————————————-

*संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन द्वारे होणार परीक्षण*

——————————————–

*जनता टाइम्स जनता टीव्ही चॅनल*

*इंसाफ चाहता है! इंडिया*

*मुख्य पत्रकार महाराष्ट्र:-अर्चना लोखंडे*

*दिनांक 10 फेब्रुवारी 2025*

नागपूर प्रतिनिधी:-नुकत्याच महाराष्ट्र राज्य च्या शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यात कापिमुक्त अभियान अंतर्गत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) तथा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा( इयत्ता दहावी) च्या परीक्षा अगदी काही तोंडावर असताना परीक्षा केंद्रात चे स्वरूप तथा तेथील कामकाजावर काही मर्यादित बदल करून गैरप्रकार कसे रोखता येईल व शांततेत व सुव्यवस्थेत परीक्षा संचालन पद्धती कशी पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडता येईल यासाठी संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे ,ड्रोन द्वारे परीक्षण बैठे पथक, भरारी पथक यासारख्या कठोर उपाय योजना करण्याचा निर्णय एका प्रसिद्धी परिपत्रकाद्वारे घेतलेला आहे.

यापूर्वी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीचे बोर्ड परीक्षा उद्या दिनांक 11 फरवरी 2005 पासून सुरू होत असून इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी पासून सुरू होत असतानाच मध्यंतरीच परीक्षा केंद्र कार्यवाही पद्धतीत कठोर असे बदल करून राज्यातील कुठल्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार ,अनुचित प्रकार, गैरप्रकारास मदत करणे यासारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी गैरप्रकार करणारा तथा गैरप्रकार करण्यास उद्युक्त करणाऱ्या, प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या वर आता कठोर कारवाई अर्थात दखलपात्र गुन्हा नोंदवून अजामीनपात्र अटक होणार असल्याचे म्हणजेच फौजदारी गुन्हा दाखल होणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षक विद्यार्थी पालक यांना सुचित केले आहे.

या सुधारित नवीन परीक्षा केंद्र संचालन पद्धतीत प्रामुख्याने जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षा केंद्रावर ड्रोन द्वारे निगराणी, एक दिवसा अगोदर परीक्षा केंद्रावर सुव्यवस्थेत भौतिक सुविधा असल्याची चाचपनी ,जिल्हा प्रशासनामार्फत बैठे पथक ,भरारी पथक ज्यामध्ये सर्व विभागाचे शासकीय अधिकारी ,कर्मचारी यांच्या समावेश, परीक्षा केंद्राबाहेर व्हिडिओ चित्रीकरण, परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक ,कर्मचारी यांची रिकग्निशन फेशियल सिस्टीम द्वारे तपासणी, परीक्षा केंद्र संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांना ओळखपत्र ,प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष गैरप्रकार करणाऱ्यावर व मदत करणाऱ्या वर दखलपात्र अजामीन पात्र फौजदारी गुन्हा नोंदवणे, परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू करणे, परीक्षा केंद्राच्या पाचशे मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद करणे आदी प्रकारच्या कठोर उपाय योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी होणार असल्याने विद्यार्थी पालक तथा शिक्षकांची पायाखालची वाळू सरकल्याचे दिसून येत आहे .

यात मात्र ज्या संवेदनशील परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक ,पर्यवेक्षक ,कर्मचारी यांची अदलाबदल झालेली आहे त्यांना मात्र तारेवरची कसरत करावे लागणार असल्याचे नाराजीचे सूर शिक्षण क्षेत्रात उमटत आहेत.

शालेय शिक्षण विभागाणे अवलंबलेल्या या कठोर उपाय योजना कारवाईची अंमलबजावणी किती प्रभावी पद्धतीने होते याकडे सर्व ज्येष्ठ नागरिक, तथा बुद्धिजीवी नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे.

सदर नवीन बद्दल झाल्याने विद्यार्थी वर्गात मात्र भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळतं आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed