महेश्वरी नाटकर हिचे सुयश/ एमपीएससी परीक्षेत महेश्वरी नाटकर उत्तीर्ण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*महेश्वरी नाटकर हिचे सुयश/ एमपीएससी परीक्षेत महेश्वरी नाटकर उत्तीर्ण*…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एम.पी.एस.सी.) वतीने ‘गट-क’ तील (ग्रुप सी)पदांसाठी डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काल (दि.11 फेब्रुवारी 2025 ) नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत रामटेक तालुक्यातील हिवरा(हिवरी)या गावातील रहिवासी कु.महेश्वरी सुरेश नाटकर ही उत्तीर्ण झालेली आहे…गट-क तील पदांपैकी ‘ ‘ कनिष्ठ सहाय्यक ‘ या पदासाठी ती पात्र ठरली आहे.
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य व्हावे या हेतूने महाज्योती या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत ती उत्तीर्ण झाली होती व तिला एक वर्षापर्यंत मासिक दहा हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती…महाज्योतीच्या नियमानुसार मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मदतीने महेश्वरीने पुणे येथे जाऊन जवळपास एक वर्ष स्पर्धा परीक्षेचा(एम.पी.एस.सी.) अभ्यास केला.महेश्वरी हिने या अगोदर महाराष्ट्र राज्य सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा (‘सेट’ ) परीक्षाही राज्यशात्र या विषयात मागील वर्षी उत्तीर्ण केली आहे. ती खैरी(बिजेवाडा)रामटेक येथील विद्यासागर कला महाविद्यालयाची(पदवी अभ्यासक्रम )माजी विद्यार्थिनी आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे एखाद्या विभागात लवकरच ‘कनिष्ठ सहाय्यक’ या पदावर महेश्वरीची लवकरच नियुक्ती करण्यात येईल.एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन या पदावर पोहचणारी मुलींपैकी ती तिच्या गावातील पहिली मुलगी ठरणार आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,कुटुंब,गुरुजन,मित्र परिवार यांना दिले असून सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे..

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
