रामटेकला अवतरले महा कुंभातील संगम जल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

रामटेकला अवतरले महा कुंभातील संगम जल
रामटेक प्रतिनिधी राजू कापसे
प्रयागराज मध्ये सध्या 26 फरवरी पर्यंत कुंभमेळा सुरू आहे. करोडोच्या संख्येने भाविक भक्त कुंभमेळ्यात स्नानाकरिता पोहोचत आहे. परंतु या कुंभ मनात वयोवृद्ध लोक किंवा लहान मुले काही कारणास्तव पोहोचू शकत नाही, अशा लोकांकरिता नागपूर मधील व्हॅल्युएबल ग्रुप यांनी एक विशिष्ट संकल्पना साकारून प्रयागराज मधील संगम जलज इथे घेऊन आले. 25000 लिटर जल या व्हॅल्यूएबल ग्रुपने इथे आणलेले आहे. 15 आणि 16 फरवरीला रेशीमबाग मैदान येथे भव्य सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. परंतु प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही सत्कार्य होऊ शकत नाही, म्हणूनच हे कुंभमेळ्यातील संगम जल प्रथम रामटेक ला आले, आज या जलाची मिरवणूक बस स्टँड ते गड मंदिर अशी होणार. आज सायंकाळी संगम जल गड मंदिर येथे पोहोचणार असून उद्या सकाळी प्रभू श्रीरामाच्या अभिषेक या जलाने होणार आहे, तसेच इतरही मुर्त्यांचे अभिषेक होणार आहे. यानंतर हे संपूर्ण जल नागपूर येथे गेल्यानंतर 15,16 फरवरीला हे संपूर्ण 25 हजार लिटल जल लोकांवर शिंपडणार आहे, त्यामुळे ज्या लोकांना या जलाने शुद्ध होऊन आशीर्वाद घ्यायचा असेल 15 आणि 16 फरवरीला त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन या व्हॅल्युएबल ग्रुपने केलेले आहे. एक विशिष्ट संकल्पना साकारून एवढे मोठे जल इकडे आणणे तसेच रामटेकला महत्त्व देणे ही कौतुकास्पद बाब आहे. आजच्या या मिरवणुकीत व्हॅल्यूएबल ग्रुपचे सर्व सदस्य रामटेक मधील संजय मुलमुले, राहुल किरपान, सुमित कोठारी, राजेश किंमतकर, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, डॉक्टर अंशूजा किंमतकर , लक्ष्मीताई मात्रे प्रामुख्याने उपस्थित होते

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
