अपयशच पचविने म्हणजेच यशाकडे वाटचाल- कुसुमताई किंमतकर

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

अपयशच पचविने म्हणजेच यशाकडे वाटचाल- कुसुमताई किंमतकर
राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक :-अपयश पचविने म्हणजेच यशाकडे वाटचाल होते. अपयश आले तरी निराश न होता मेहनत करणे गरजेचे आहे. त्याकरीता कठार परीश्रम घेतले कि, यश नक्कीच पदरात पडते. असे प्रतिपादन ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कुसुमताई किंमतकर यांनी केले. त्या ज्ञानदीप विद्यामंदीर करवाही येथे आयोजीत विद्यार्थ्यांना निरोप समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाचे पाहूने, संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र किंमतकर, सदस्य ऋषकेश किंमतकर, करवाहीच्या उपसरपंच अनुराधा गडेर, माजी सरपंच उदाराम गाडापेले, सदस्या प्रमिला साईलवार, संतोषी टेकाम आदी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्राची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याद्यापक केशव गोरडे यांनी केले. यावेळी ऋषीकेष किंमतकर,अनुराधा गडेर, संतोषी टेकाम सह विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले.
यानिमित्याने विद्यार्थ्यांना शुभेच्छासह टोपी, टी शर्ट, पेन, पेपर पॅड इत्यादी साहित्य वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तृप्ती उईके तर आभार प्रदर्शन उन्नती सुहागपूरे या विद्यार्थिनिंनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता अमीत तडस, लुकेश चरडे, कैलास निघोट, सुभाष गायकवाड, नंदू मलघाटे, भोले साईलवार, रमला सिरसाम, रायवंती कुमरे, छाया रोकडे यांनी सहकार्य केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
