नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या समवेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे प्रस्तावित चित्रनगरी आढावा बैठक – जनता टाइम्स न्यूज

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या समवेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे प्रस्तावित चित्रनगरी आढावा बैठक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आज दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या समवेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे प्रस्तावित चित्रनगरी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे घेण्यात आली.

राजु कापसे

रामटेक

रामटेक येथे भव्य चित्रनगरी उभारल्याने नागपूर विदर्भाच्या विकासाला मोठया प्रमाणात हातभार लागणार आहे हे लक्षात घेऊन या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

सदर बैठकीत महसूल विभागाकडे असलेली १२८ एकर जागा सांस्कृतिक विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणे, चित्रनगरीच्या जागेचा ताबा, आराखडा व नियोजन यासाठी सल्लागाराची नियुक्ती करणे, सिनेमाशी सबंधित तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देणारी संस्था उभारणे, चित्रनगरीत जास्तीत जास्त चित्रीकरण होण्यासाठी सवलत योजना तयार करून मसुदा तयार करणे या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली

रामटेक येथील खिंडसी तलावाजवळ चित्रनगरी तयार करण्यात येणार आहे. चित्रीकरण व इतर बाबींसाठी ही जागा योग्य असून हे ठिकाण वनक्षेत्राशी जोडले असल्याने पर्यटनास भरपूर वाव आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. चित्रनगरीसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.चित्रीकरणासाठी लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चित्रनगरीसाठी याक्षेत्रातील लोकांनी कार्यशाळा घ्याव्यात, असे ते म्हणाले.

या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश छत्तिसगड येथील निर्मात्यांना डाक्युमेंटरी, लघुपट तयार करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

ही चित्रनगरी नागपूर विमानतळ येथून अवघ्या ४० किलोमिटरवर आहे. याभागात रिसार्ट भरपूर आहेत. यासर्व बाबींचा लाभ निर्मात्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed