शिक्षक -विद्यार्थी यांचे ऋणानुबंध सदैव टिकून राहावे——-भोंगाडे मॅडम यांचे प्रतिपादन* —————————————— *प्रियंवदा येथे इयत्ता दहावीचा शुभचिंतन सोहळा थाटात संपन्न*. ——————————————- *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*
शिक्षक -विद्यार्थी यांचे ऋणानुबंध सदैव टिकून राहावे——-भोंगाडे मॅडम यांचे प्रतिपादन*
——————————————
*प्रियंवदा येथे इयत्ता दहावीचा शुभचिंतन सोहळा थाटात संपन्न*.
——————————————-
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*इन्साफ चाहता है! इंडिया*
*दिनांक 13 फेब्रुवारी 2025*
*कारगाव सर्कल प्रतिनिधी :-रत्नपाल मेश्राम*
कारगाव सर्कल प्रतिनिधी: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2025 अगदी काही तोंडावर असतानाच प्रत्येक विद्यार्थ्याने नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास कृती आराखडा आखून त्यावर प्रामाणिकपणे कार्य केले तर वाळवंटी भागातही यशाचे फुल उमलल्या शिवाय राहणार नाही असे मार्मिक प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीय स्थानावरून बोलताना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सालेभट्टीचे मुख्याध्यापिका सौ. भोंगाडे मॅडम यांनी केले.
प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोज गुरुवारला दुपारी दोन वाजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या शुभचिंतन सोहळा अर्थात फेरवेल कार्यक्रम च्या निमित्ताने ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की शिक्षक- विद्यार्थी यांचे ऋणानुबंध नाते कायम असले तर जीवनात कधीच समस्या येणार नाही हे नाते जोपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी या शुभचिंतन सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य राजू शिवणकर सर ,प्रमुख अतिथी म्हणून विलास तांबे सर, प्रदीप लोखंडे सर ,ठाकूर सर आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला प्रामुख्याने किशोर मेश्राम (माजी ग्रामपंचायत सदस्य), पांडुरंग वरखडे, पालक वर्गातील सौ .आम्रपाली फुलझेले, सौ, छाया नरुले, जयेंद्र नाईक आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री राजू शिवणकर सर म्हणाले की शाळेचे ऋण कधी फिटणार नाही किंवा कधी मिटणार नाही तेव्हा शाळेचे संस्कार तथा कठोर मेहनत यांचा समन्वय साधल्यास जीवनाच सोने झाल्याशिवाय राहणार नाही असे मार्मिक प्रतिपादन यावेळी केले.
तसेच विलास तांबे सर यांनी आपला मनोगतात ,आपण शिस्त ,संयम, आणि सराव या त्रिगुणी सूत्राचा अवलंब केल्यास जीवनातील प्रत्येक लढ्यातील यश हा तुमच्याच असेल यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
वर्गशिक्षक म्हणून प्रदीप लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःमधील वेगळेपण शोधल्यास, नैसर्गिक कलागुणांचा स्वीकार केल्यास व त्यानुसार योग्य दिशेने प्रवास केल्यास तुमच्या जीवनात यशाची सोनेरी बाग फुलल्या शिवाय राहणार नाही आणि जीवनातील कुठलीही अडचण तुम्हाला रोखू शकणार नाही यासाठी सातत्यपूर्ण सराव व वेळेचा सदुपयोग करण्याचे व्यस्त राहून स्वस्थ आणि मस्त राहण्याचे आवाहन केले. तसेच श्रीफुल्तन ठाकूर सर यांनी सुद्धा आपला भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी,वर्ग 10 च्या सौजन्याने आयोजित केलेल्या या फेरवेल कार्यक्रमात प्रामुख्याने मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तथा राजश्री जिजाऊमाता यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करीत या राष्ट्रमातांना आदरांजली वाहण्यात आली तथा केक कापून समस्त विद्यार्थ्यांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
या भावुक व हळव्याप्रसंगी वर्ग दहाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यामध्ये प्रामुख्याने वर्ग 10 चे वर्गप्रतिनिधी आदित्य फुलझेले , हिमांशू डडमल, कु. नीतू नरुले , कु. मोनाली गायधने, कू.माहेश्वरी इरपाते,कू. अनुष्का बोरकर, साहिल मेश्राम ,रोशन बोरकर आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळाप्रती तथाशिक्षकाप्रती आपल्या भावना आणि विचार व्यक्त केले तथा हीच शाळा आजन्म मिळो अशी ही प्रार्थना करून डोळ्यातील अश्रूंच्या धारा ओथंबून वाहू लागल आणि क्षणातच वातावरण अत्यंत भावनिक तथा रडवा झाला हे मात्र विशेष.
चिरकाल स्मरणात राहावं म्हणून वर्ग 10 च्या वतीने वर्ग 10 चे वर्ग प्रतिनिधी कु. आचल गेडाम, कु. समीक्षा डांगरे ,आदित्य फुलझेले, हिमांशू डडमल, कु. अनुष्का बोरकर, कु. स्नेहा तुमराम, कु. मोनाली गायधने, कु.सुहाना दांडेकर कु.माहेश्वरी इरपाते ,रोशन बोरकर ,वंशिक शेंडे ,मोहिते तीवाडे, कु. सायली मांढरे कु.कशिश मेश्राम आदि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने वर्ग दहा च्या वतीने विद्यालयास आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा भेट स्वरूपात दिले तर वर्ग 10 चे वर्ग शिक्षक श्री प्रदीप लोखंडे यांना महान कारूनिक , अहिंसा ,शांती व करुनेचे सागर, सुख दुःखाचे निवारक थोर वैज्ञानिक सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध या महामानवाची मूर्ती एक अविस्मरणीय भेट (गुरुदक्षिणा) म्हणून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 10 चे वर्गप्रतिनिधी कु. समीक्षा डांगरे, प्रास्ताविक वर्ग प्रतिनिधी कु. आचल गेडाम तर आभार प्रदर्शन कु. ऋतिका भोयर यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कु.समीक्षा डांगरे ,आचल गेडाम नीतू नरुले कुमारी ऋतिका भोयर शैलेश उईके, भूषण लांडे, सुजल कुकडे, रोशन बोरकर, हिमांशू डडमल ,आदित्य फुलझेले, वंशिक शेंडे, रोशन वैरागडे, गणेश सिडम , कु.संचिता चौधरी ,कु.प्रतीक्षा गोडमारे, सिमरन मेश्राम ,अंजली मेश्राम ,स्नेहा तुमराम , मोनाली गायधने, स्वाती जीवतोडे सुहाना दांडेकर, कुमारी कशिष मेश्राम,दिव्या भुरे ,श्रावणी नंदागवळी , हर्षा मंगर आदि विद्यार्थ्यांनी अब तक परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचा समारोप अत्यंत स्नेहपूर्ण व शांततेच्या वातावरणात स्नेहभोजनाने करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान सौ .मंडपे ताई देवराव भोयर ,वामन वानखडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
