सर्पदंशाने घेतला शेतकऱ्याचा बळी* —————————————– *रात्रीचे सिंचन जीवावर बेतले* —————————————– *झरप येथील घटना, शवविच्छेदन आटोपले* *जनता टाइम्स जटा टीवी चैनल* *इन्साफ चाहता है! इंडिया*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

- *सर्पदंशाने घेतला शेतकऱ्याचा बळी*
—————————————–
*रात्रीचे सिंचन जीवावर बेतले*
—————————————–
*झरप येथील घटना, शवविच्छेदन आटोपले*
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*इन्साफ चाहता है! इंडियाρ
*दिनांक :-16 फेब्रुवारी 2025*
*भंडारा गोंदिया जिल्हा प्रतिनिधी:- महेश शिवणकर*
पालांदूर:-लाखनी तालुक्यातील झरफ येथील शेतकरी शेतात उन्हाळी धानाचा रोवना करण्याकरिता चिखलावर पाणी सोडण्याकरिता शेतावर जाताना लगतच दबा धरून बसलेल्या विषारी सापाने काळोख अंधाराचा फायदा घेत अचानक शेतकऱ्यावर वार करत निष्पाप शेतकऱ्याचा बळी घेतल्याची घटना नुकतेच पुढे आलेली आहे.
मृतक शेतकऱ्याचे नाव जाधव नारायण शिवणकर (वय 65 वर्ष) असे असून तो झरप तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावात स्मशान शांतता पसरली.
सदर इसम हा शेतावर पाणी देण्यासाठी जात असताना रात्रीचा काळोख अंधार असल्याने त्याला काहीच दिसलं नाही मात्र जवळ दबा धरून असलेल्या सापाला कसली तरी जाणीव झाल्याने लगेचच त्याने इसमावर झडप घालून त्याचा पायाचा चावा घेतला.
मात्र पायाला काहीतरी रुतल्यागत वाटल्याचा त्याला भास झाला. लगेच त्याला आगळीवेगळी शंका आल्याने त्याने गावात पळ काढला. गावात येताच मित्रासोबत मुरमाडी/तूप. ता.लाखनी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढे लाखनी येते हलवण्यात आले.
मात्र विषाची तीव्रता जास्त असल्याने तिथून सुध्दा जिल्हा रुग्णालय भंडार्याकरिता उपचारार्थ नेत असताना वाटेतच गडेगाव जवळ रात्री ११ वाजे दरम्यान शेवटचा श्वास घेत दम तोडला.
सदर घटनेची महिती देशप्रेमी सेवा संस्था व छत्रपति संभाजी शेतकरी संगठनाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आली.
मृतक शेतकऱ्याला दोन मुले व दोन मुली आहेत असल्याची समजते. घटनेची महिती संबंधीत पोलिसांना मिळताच पलांदुर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुधील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. सदर दु:खद घेटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
या घटनेने गावात महावितरण वेळेच्या नियोजनावर खापर फोडले असुन शेतविजपूर्वाठा कालावधी रात्रीचा असल्यानेच शेतकऱ्यांल जीव गमवावे लागले असल्याची नागरीकांचे आरोप होत आहे हे मात्र विशेष.
वस्तुस्थिति ही आहे की रात्रीला सिंचनाची वीज मिळते. शेती रात्रीची झाली आहे. मृतक जाधव कडे दोन एकर शेती आहे. शेती करिता ८ तास विजेचे नियोजन आहे. चार दिवस दिवसपाळीत तर तीन दिवस रात्रपाळीत शेतकऱ्यांना वीज मिळते. अनेकदा रात्रपाळीत शेतकऱ्यांना स्वापदे व हिंस्त्र वन्य प्राण्यांचा धोका पत्करून शेती करावी लागत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी जाधव ठरलाअसल्याची गावात सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.
परिसरात महावितरण व महाराष्ट्र शासनाच्या या जीवघेण्या धोरणा विरोधात मोठा रोष व्यक्त होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
