नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मा. उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची कन्हान नगरीत विराट आभार सभा! – जनता टाइम्स न्यूज

मा. उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची कन्हान नगरीत विराट आभार सभा!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*मा. उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची कन्हान नगरीत विराट आभार सभा!*

राजु कापसे प्रतिनिधी

रामटेक :- विधानसभा निवडणुकीत शिवसेना -महायुतीला मिळालेला भव्य विजय हा जनतेने महाराष्ट्राला दिलेला कौल आहे. या विजयासाठी रामटेकच्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी राज्याचे लाडके मा. उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भव्य आभार सभेला उपस्थित राहून रामटेकच्या माझ्या जनतेला संबोधित केले. सतत जनसामान्यांमध्ये राहणारा नेता, शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून अवघ्या महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेबांची ओळख आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहोत.
या वेळी उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी जनतेला संबोधित करत रामटेकच्या जनतेचे आभार मानले. वंचित शोषित दलित शेतकरी आदिवासी बांधव या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही शिवसेना-महायुतीला भरभरून आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी रामटेकच्या जनतेला केले व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी प्रोत्साहित केले.
सदर कार्यक्रमात रामटेकचे उबाठा गट जिल्हाप्रमुख श्री राजू हरणे, जिल्हा संघटन प्रमुख श्री अशोक झिंगरे, नागपूरचे माजी नगरसेवक, सावनेर तालुका प्रमुख श्री नरेंद्र मोरे, श्री गणेश कानरकर, कळमेश्वर तालुका प्रमुख श्री राहुल जुणारकर, नागपूर ग्रामीण तालुका प्रमुख श्री मदन अनासने, नरखेड तालुक़ा प्रमुख श्री हेमंत नखाते, श्री प्रवीण सवारकर, काटोल विधानसभा उपजिल्हा प्रमुख श्री प्रशांत मानकर, सावनेर उपजिल्हाप्रमुख श्री घनश्याम मकासरे तसेच उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी, आमचा बळीराजा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काम करणे हीच आमची प्राथमिकता आहे.
शिवसेना महायुतीला विदर्भ आणि महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळवून दिल्याबद्दल आणि या विराट आभार सभेला उपस्थित राहून तमाम रामटेकवासियांचे आभार व्यक्त केल्याबद्दल आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रामटेकच्या जनतेचे आभार मानले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed