नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , डोंगरी येथे राजाभोज जयंती महोत्सव व शिवजयंती निमित्त राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या सत्कार – जनता टाइम्स न्यूज

डोंगरी येथे राजाभोज जयंती महोत्सव व शिवजयंती निमित्त राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या सत्कार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*डोंगरी येथे राजाभोज जयंती महोत्सव व शिवजयंती निमित्त राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या सत्कार* 🚩🚩🚩🚩🚩

पोवार समाज बहुउद्देशीय संस्था रामटेक व पोवार समाज डोंगरी यांच्यातर्फे चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती महोत्सव पोवार समाज संमेलन व शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम गावातून सम्राट राजाभोज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे सोबत तसेच वेशभूषा रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मा. मोतीलालजी चौधरी उपाध्यक्ष राष्ट्रीय पवार महासभा तसेच *उद्घाटक* व *सत्कारमूर्ती* श्री. मा. ऍड.आशिषजी जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भगवानदासजी बिसणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री राहुल जयतवार व कु.प्रियांका शरणागत यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात पोवारी गीतांवर, महिलांनी व मुलींनी नृत्य व लेझीम नृत्य उत्तमरीत्या सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मा. मोतीलालजी चौधरी व मार्गदर्शक श्री मा. प्रमोदजी पटले अध्यक्ष पवार समाज पूर्व नागपूर यांनी समाज बांधवांनी संघटित राहण्यासाठी आपल्या बोलीभाषा व संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे श्री.मा.लीलाधरजी पटले सदस्य पंचायत समिती हिंगणा नागपुर,श्री. मा. छत्रपालजी पटले खंड विकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी उमरेड,

श्री. मा. देवानंदजी टेंभरे, मा. श्री. छेदनभाऊ कटरे, मा.श्री. दीनदयालजी पारधी, मा.श्री. नितेश फरकाडे, मा.श्री. रमेश चौधरी नागपूर संघटन उपस्थित होते. गावातील सरपंच मा.सौ. मनीषाताई माकडे इतर ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.रवींद्र देव्हारे, सौ.पुजा शरणागत पोलीस पाटील डोंगरी.सौ.रेखा रहांगडाले पोलीस पाटील महाराजपूर माजी सरपंच श्री रामचंद्रजी शरणागत व सौ. रुक्मिणीबाई शरणागत डोंगरी. सौ. जशोदाबाई रहांगडाले माजी पं.स.सदस्या श्री.मा.बालकजी शरणागत उपस्थित होते. व सर्व गावकरी यांच्या उपस्थितीत आदरणीय राज्यमंत्री श्री. मा.ऍड.आशिषजी जयस्वाल साहेब यांचा शाल,श्रीफळ व वृक्ष, सम्राट राजाभोज यांची प्रतिमा,देऊन संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री भगवानदासजी बिसने यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. माननीय मंत्री महोदय यांनी समाज विकासासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मार्च 2024 वर्षात इयत्ता दहावी व बारावी प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, माजी सैनिक, डोंगरी गावातील शासकीय सेवेत असणारे कर्मचारी व अधिकारी, तसेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले समाज कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व उच्च शिक्षण पदव्युत्तर पदवी प्राप्त (Msc. M.Pharm) विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, श्री.छमेशकुमारजी पटले (उपाध्यक्ष) श्री. संजयजी बिसेन (सचिव) श्री.कमलेशजी शरणागत, श्री कांतीलाल पटले श्री.शालिक टेंभरे. श्री बबलू गौतम, आशिषजी शरनागत, श्री भजनलालजी कटरे, श्री सचिन भोयर, श्री उमेश पटले, श्री किशोर रहांगडाले, श्री खरकसींग बिसेन श्री रामरातन भगत, श्री हेमराज चौधरी. श्री.ठगलाल भगत यांनी व समस्त पवार समाज डोंगरी येथील पोवार युवा कार्यकारिणी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed