क्रिडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विजेत्यांचा सत्कार* —————————————— * *जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते गौरव* ——————————————— *दिनांक:-23.2.2025* *जनता टाइम्स जनता टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*क्रिडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विजेत्यांचा सत्कार*
——————————————
* *जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते गौरव*
———————————————
*दिनांक:-23.2.2025*
*जनता टाइम्स जनता टीवी चैनल*
*इंसाफ चाहता है! इंडिया*
*मुख्य पत्रकार महाराष्ट्र:- सौ.अर्चना लोखंडे*
नागपूर प्रतिनिधी:-: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत आयोजित जिल्हा परिषद कर्मचारी- अधिकारी क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विजेत्यांचा गुणगौरव सोहळा आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे पार पडला. भिवापूर येथील महिला शिक्षिका सघाने व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत यश संपादित केले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. विनायक महामुनी यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन भिवापूर तालुक्यातील विजेत्या महिला शिक्षिका संघाला गौरविण्यात आले तथा पुढील भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आले.
प्रशिक्षक सुरज येल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाचे व कर्णधार मेघा गुरनुले यांच्या नेतृत्वात संघातील शिला रोडे,ऊषा पराते, कुंदा घोडमारे, संगीता बनसोडे, आरती देवगडे या महिला खेळाडूंचा समावेश होता.
विशेष म्हणजे महिला शिक्षिका संघाच्या यशामागे प्रशिक्षक सुरज येल्ले यांनी केलेला अथक परिwश्रम असून संघातील प्रत्येक खेळाडूने प्रामाणिक अविरत प्रयत्न केले हेही तितकेच खरे आहे.
या यशामुळे भिवापूर तालुक्यातील महिला शिक्षिका सघाने तालुक्यात दुसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत भिवापूर तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा रोवण्यात बहुमान पटकावलेला आहे. अर्थातच या सांघिक विजयाने संपूर्ण भिवापूर तालुक्यात महिला शिक्षण क्षेत्राचा मान उंचावला आहे.
थोडक्यात महिला शिक्षिका संघाने मिळवलेला हा विजय तालुक्यातील इतर सर्व शिक्षिका -शिक्षक संघासाठी प्रेरणादायी ठरेल यात तीळ मात्र शंका नाही.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
