*उमरेड विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीचे राजु मेश्राम व पत्नी सपना मेश्राम यांनी शिंदे गटात केला प्रवेश* * ——————_ *वंचित बहुजन आघाडीला सोडचिट्टी नि शिंदे गटाला मारली मिठी* —————- *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*उमरेड विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीचे राजु मेश्राम व पत्नी सपना मेश्राम यांनी शिंदे गटात केला प्रवेश*
* ——————_
*वंचित बहुजन आघाडीला सोडचिट्टी नि शिंदे गटाला मारली मिठी*
—————-
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल
*इन्साफ चाहता है! इंडिया*
नागपूर प्रतिनिधी:-
उमरेड विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढलेल्या सपना मेश्राम यांनी आपल्या पती राजेंद्र मेश्राम सोबत कन्हान येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
विशेष म्हणजे सपना मेश्राम यांनी २०२४ ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढविली होती.
वास्तव पाहता राजु मेश्राम हे प्रकाश आंबेडकर यांच्या जवळचे विश्वासू मानले जात होते. त्यांनी उमरेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली आहेत. ते अगोदर पासून पक्ष प्रवेशासाठी हालचाली सुरू ठेवत होते. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरही ते उमरेड येथील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळीक असलेल्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते.
या अदलबदलच्या राजकारणामुळे आता वंचित बहुजन आघाडी कडून शिवसेना शिंदे गटात आलेल्या मेश्राम दाम्पत्याला सत्ताधारी महायुतीत सहभागी झाले असले तरी महायुतीतील किती नेते व कार्यकर्ते त्यांना जवळ घेतील हा प्रश्न केवळ संशोधनाचाच नसून नागरिकांना सुद्धा संभ्रमात टाकणारा आहे असे खमंग चर्चा परिसरात दरवळत आहे.
आता येणारा राजकीय काळच मेश्राम दाम्पत्याला राजकीय स्थिरता कितपत मिळवून देतो याची प्रतीक्षा करणे उत्साहाचे ठरेल.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
