*नाभिक समाजाने परंपरागत व्यवसायासोबतच शिक्षणात प्रगती करावी- प्रा राजेश नंदपुरे ______ अड्याळ येथे पवनी तालुकास्तरीय नाभिक समाजाच्या मेळावा ,वधू वर परिचय, गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठांचा सत्कार या प्रसंगी मार्गदर्श संजीव भांबोरे_____ जनता टाइम्स जटा टीवी चैनल
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

नाभिक समाजाने परंपरागत व्यवसायासोबतच शिक्षणात प्रगती करावी- प्रा राजेश नंदपुरे
अड्याळ येथे पवनी तालुकास्तरीय
नाभिक समाजाच्या मेळावा ,वधू वर परिचय, गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठांचा सत्कार या प्रसंगी मार्गदर्शसंजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)
भंडारा : नाभिक समाजाने परंपरागत व्यवसायासोबतच आपल्या मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देऊन त्यांना त्यांचे भविष्य उज्वल करण्याकरता प्रगती करावी व समाजाचा सुद्धा उद्धार करावा कारण शिक्षण हे वाघिणीचे दिवस असून जो प्रसन्न करेल तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले .त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले की ,आपला समाज अल्पसंख्यांक असून आपण संघटित होऊन एकमेकांच्या विचाराने आपण आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे सुद्धा महाराष्ट्र महामंडळ मुंबई जिल्हा शाखा भंडारा तालुका शाखा पवनी च्या वतीने 7 मार्चला सकाळी 10 वाजता रोज शुक्रवारला आयोजित नाभिक समाज मेळावा ,उपवर वधू वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्काराचे आयोजन प्रसंगी गणेश मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले .कार्यक्रमाचे उद्घाटन राजेंद्रजी इंगळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नाभिक महामंडळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.अशोकराव सालोटकर पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष नाभिक महामंडळ उपस्थित होते .प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र फुलबांधे कार्याध्यक्ष नागपूर जिल्हा, मधुकर फुलबांधे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष, प्रमोद मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष, रोशन उरकुडे ज्येष्ठ नागरिक, जगदीश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष, अशोकराव फुलबांधे जिल्हा कार्याध्यक्ष ,नीताराम पवनकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ,घनश्याम बनकर, डेव्हिड मेश्राम ,शरदभाऊ उरकुडे पूर्व विदर्भ अध्यक्ष, श्रीमती मायाताई लांजेवार ,जिल्हाध्यक्ष विठोबाजी मेश्राम जिल्हा सचिव, विजय भाऊघुमे माजी तालुका अध्यक्ष ,हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,, विवेक येवतकर वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ ,प्राध्यापक राजेश नंदपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन तूशांत नैनपूरकर सहसंघटक पवनी, किशोर भाऊ कावळे कोषाध्यक्ष शाखा अड्याळ,विष्णु उरकुडे देखरेख प्रमुख, किशोर क्षीरसागर सचिव ,अक्षय शेंडे कोषाध्यक्ष मेळावा समिती, राजूभाऊ फुलबांधे देखरेख प्रमुख ,रितेश कावळे सहसचिव ,योगेश क्षीरसागर देखरेख प्रमुख ,तारेश मौदेकर अध्यक्ष पवनी तालुका ,संजयभाऊ फुलबांधे उपाध्यक्ष पवनी तालुका ,पराग दहिकर सचिव पवनी तालुका यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना भोजनदान देण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
