पांजरेपार पुनर्वसन ग्रामपंचायत येथील महिला सरपंच यांची उचल बांगडी* ………………………………………… *अविश्वास ठरावाने महिला सरपंच पदमुक्त* ……………………………………….. *किसन बोरकर यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत हंगामी सरपंच* …………………………… जनता टाइम्स जटा टीवी चैनल.
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*पांजरेपार पुनर्वसन ग्रामपंचायत येथील महिला सरपंच यांची उचल बांगडी*
…………………………………………
*अविश्वास ठरावाने महिला सरपंच पदमुक्त*
………………………………………..
*किसन बोरकर यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत हंगामी सरपंच*
……………………………………..
*भिवापूर प्रतिनिधी*
भिवापूर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या
ग्रामपंचायत पांजरेपार ( पुर्नवसन ) येथील महिला सरपंच यांचेवर अविश्वास ठराव पारीत झाल्याने उपसरपंच किसन बोरकर यांच्याकडे पुढील आदेश होइपर्यंत येथील पांजरेपार ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यभार स्विकारण्याचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती किसन बोरकर यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत पांजरेपार (पुर्नवसन ) येथील थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आकाक्षा पंकज मानवटकर यांचे विरुद्ध अविश्वास ठराव पारीत झाले तसेच विशेष ग्रामसभेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
यात उपस्थित मतदाराचे अविश्वास ठराव असणारे व विरुद्ध बाजुने असणाऱ्याची शिरगिणती करून सरपंच मानवटकर यांचे विरुद्ध ठराव पारित झाल्याने महाराष्ट्र शासन राजपत्र २६ ऑगस्ट २०२२ मध्ये नमुद केल्यानुसार पांजरेपार ग्राम पंचायत येथील सरपंच पदाचा कार्यभार उपसरपंच पाजरेपार यांचेकडे पुढील आदेश होइपर्यत देण्यात यावे असे पत्र प्राप्त झाल्यांची माहिती उपसरपंच बोरकर यांनी आज २६ मार्च बुधवारला दुपारी १२ वाजता दिली आहे. यासंदर्भात शासनाचे पुढील आदेश काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
