नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तणसीचा ढिगारा बनला ‘त्या’ शेतकऱ्यासाठी सरण !*  ……………………………………….. *हृदयद्रावक घटना:* *धुरे पेटवताना अनवधनाने स्वतःही जळला* …………………………………… *जनता टाइम्स जटा टीवी चैनल* – जनता टाइम्स न्यूज

तणसीचा ढिगारा बनला ‘त्या’ शेतकऱ्यासाठी सरण !*  ……………………………………….. *हृदयद्रावक घटना:* *धुरे पेटवताना अनवधनाने स्वतःही जळला* …………………………………… *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*तणसीचा ढिगारा बनला ‘त्या’ शेतकऱ्यासाठी सरण !*

………………………………………..

*हृदयद्रावक घटना:* *धुरे पेटवताना अनवधनाने स्वतःही जळला*

……………………………………

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

*तालुका प्रतिनिधी: काजल तांबे

पवनी :— शेतातील धुरे पेटवित असताना नकळतपणे शेतकऱ्याच्या कापडाला ही आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेने शेतकरी अडखळत बाजूलाच असलेल्या तनसीच्या ढिगार्‍यावर कोसळला. मात्र क्षणभरात तनसीनेही पेट घेतल्याने शेतकऱ्याला बाहेरच पडता आले नाही. यात त्यांचा जळून करून अंत झाला.

हा दुर्दैवी शेतकरी रमेश रामटेके (वय ६०.नेरला ता. पवनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी २च्या सुमारास नेरला शिवारात घडली. तणसीचा ढिगारात शेतकऱ्यांसाठी त्याचे सरण ठरले …

प्राप्त माहितीनुसार अल्पभूधारक शेतकरी असलेले रमेश रामटेके हे स्वतःच्या शेतातील धुरे जाळण्याकरिता बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घरून एकटेच गेले होते. दुपार होऊनही घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतल्यानंतर घटना उघडीकीला आली. धुरे पेटवित असताना त्यांच्या पॅन्ट ला आग लागली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराने ते घाबरले. यामुळे कसा बसा अडखळत ते बाजूला असलेल्या तणसीच्या ढिगार्‍यावर जाऊन कोसळले . परिणामी सुकलेल्या तनसीने पेट घेतल्याने क्षणात भडका उडाला. आधीच्या भडक्यातून त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यात त्यांचा जडून दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच आडयाळ पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला .

मृत रमेश रामटेके यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,दोन मुली असा बराचआप्त परिवार आहे.

*खबरदारी घेण्याची गरज*

*एकाच आठवड्यातील दुसरी घटना*:- दरम्यान अशीच घटना 27 मार्चला सकाळी 11 वाजता पवनी तालुक्यातील रेवणी शेत शिवारात घडली होती शेतामधील कचरा जाळताना साडीला आग लग्न रुखमाबाई यशवंत मेश्राम नामक ८० वर्षीय महिलेचा जडून मृत्यू झाला होता त्यानंतर एकाच आठवड्यात शेत शिवारात घडलेली ही दुसरी दुर्दैवी घटना आहे त्यामुळे शेतशिवारावर एकट्याने काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed