कोलयार्ड सुरक्षित ठिकाणी उभारा!*……*नागरिकांची मागनि* ……………………………………….. *उमरेड येथील विविध सामाजिक संघटनांना पुढाकार* …………………………………….. *तहसीलदार मनोहर चव्हाण यांना निवेदन* ………………………………….. *नागरिकांचे आरोग्य धोक्यात* …………………………………….. *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*कोलयार्ड सुरक्षित ठिकाणी उभारा!*……*नागरिकांची मागनि*
………………………………………..
*उमरेड येथील विविध सामाजिक संघटनांना पुढाकार*
……………………………………..
*तहसीलदार मनोहर चव्हाण यांना निवेदन*
…………………………………..
*नागरिकांचे आरोग्य धोक्यात*
……………………………………..
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल
*तालुका प्रतिनिधी :-काजल तांबे*
*उमरेड*. , राष्ट्रीय महामार्ग३५६ डी ,आमनदी आणि गंगापूर, बुधवारी ,कावरा पेठ ,या परिसराला खेटूनच तयार होत असलेला ‘कॉल डेपो’ चुकीच्या ठिकाणी उभारला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा आरोग्यास धोकादायक कोलयार्ड या परिसरातून दुसरीकडे करा. अशी मागणी आता जनमानसातून व्यक्त होत आहे .
नागपूर- नागभीड या ब्रॉडगेज लाईनचे काम फारसे गतिमान दिसत नसले तरीही ब्रोडगेज रेल्वे लाईनला डब्ल्यूसीएलच्या आसपासपर्यंत ‘कनेक्टिंग रेल्वे लाईनचे काम युद्धस्तरावर जवळपास पूर्णत्वास येत आहे. या ‘कनेक्टिंग रेल्वेलाईन ‘च्या मध्यातून कोळसा वाहतूक साधली जाणार आहे .असे असले तरी गांगापूरजनीक डेपोच्या ‘ कोल डेपो ‘च्या निर्मितीचे काम होत असल्याने परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी यात विरोध दर्शविला आहे . आता विविध सामाजिक संघटना कृषी समितीने याबाबतचे निवेदन सोपवीत आरोग्यास धोकादायक कोलयार्ड या परिसरात करू नका. कोलयार्ड प्रोजेक्ट अन्य सुरक्षित ठिकाणी उभारा ,अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आले.
विशेष म्हणजे उमरेड चे आमदार संजय मेश्राम यांनीही कोलयार्ड बाबतचा मुद्दा कडे राज्य सरकारचे लक्ष वेधले .त्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडून राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या समक्ष प्रश्न उपस्थित केला होता.
तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनी आवश्यक्यतेनुसार जनसुनावणी घेणार असा शब्द विधानसभेत दिला होता . कॉलयार्ड बाबतचा मुद्दा विधानसभेतही गाजला ,हे येथे उल्लेखनीय.
त्यामुळे आता शासन- प्रशासन सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण समस्येवर काय उपाययोजना करणार ,असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
