नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तालुकास्तरावर चक्रवर्ती महान सम्राट अशोक राजा यांचे जयंती उत्सवात* ……………………………………. *प्रथमताच गावा गावात जयंती उत्सवाने नवचैतन्य* ………………………………………. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल – जनता टाइम्स न्यूज

तालुकास्तरावर चक्रवर्ती महान सम्राट अशोक राजा यांचे जयंती उत्सवात* ……………………………………. *प्रथमताच गावा गावात जयंती उत्सवाने नवचैतन्य* ………………………………………. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*तालुकास्तरावर चक्रवर्ती महान सम्राट अशोक राजा यांचे जयंती उत्सवात*

…………………………………….

*प्रथमताच गावा गावात जयंती उत्सवाने नवचैतन्य*

………………………………………*भिवापूर प्रतिनिधी* राजू सागरे

अभूतपूर्व प्रथमताच भिवापूर तालुक्यात यावर्षी दिनांक 5 एप्रिल 2025 रोज शनिवारला महान चक्रवर्ती प्रियदर्शी राजा यांची 2329 वी जयंती पर्व भिवापूर तालुक्यातील गावा- गावा मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भिवापूर च्या प्रांगना मध्ये आज शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जन्मदिन पर्व साजरा करण्यात आला.

जयंती उत्सवाची सुरुवात शांतीचे संदेश देणारे महाकारुणिक बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्ती ला माल्याअर्पण करून दीप प्रज्वलनाणे करण्यात आले, तसेच बोधिसत्व विश्वरत्न, प्रबुद्ध भारताचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मुर्ती ला सुद्धा माल्याअर्पण करून दीप प्रज्वलीत करण्यात आले. त्यांनतर लगेच चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला माल्याअर्पण करून दीप प्रज्वलीत करण्यात आले.

या मंगलमय प्रसंगी चक्रवर्ती प्रियदर्शी अशोक सम्राट यांच्या जीवनवर प्रकाश पाडणारे पुस्तकाचे अनावरण करून वाचन करण्यात आले.

यावेळी विचार मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी सम्राट अशोक यांच्या जीवनावर प्रकाश टाकत यापुढे प्रत्येक वर्षी चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांचे जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात येणार असल्याचे उपस्थितांना आव्हाहन केले.

याप्रसंगी विचार मंचावर माजी नगराअध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले की “सम्राट अशोक यांची जयंती शासनाने शासकीय कार्यलयामध्ये मोठ्या उत्सहाने साजरी करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून पुढाकार घ्यावे आणि यासाठी जनतेने एकत्रित यावे अशे सुद्धा आव्हाहन केले.

या जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष लव जनबंधू हे होते .तसेच कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तुलाराम जांभुळकर,पत्रकार जोगेंद्रजी सरदारे,प्रशांत गायकवाड, धर्मपाल राहाटे, निरंजन धनविजय, सचिन काळे, राकेश थुलकर, अभिषेक बन्सोड,प्रणय रामटेके,नीरज तांबे, वैशालीताई खंडाळे, अर्चना मोटघरे, स्नेहा आत्राम, संगीता गोवर्धन,धम्ममाला टेटू, तसेच भिवापूर मधील बौद्ध समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगत वाघमारे , प्रास्ताविक मिथुन दुपारे यांनी तर आभार मयूर अंबादे यांनी मानले.

विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आयोजन बौद्ध पुरातत्व वास्तू संरक्षण व संवर्धन समिती भिवापूर यांनी केले

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भिवापूरचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed