रामनवमीनिमित्त भव्य शोभा यात्रा मिरवणुकीने भिवापूर नगरी दुमदुमली* ………………………………………. *ढोल ताशाच्या गजरात श्रीरामांचा जयघोष* …………………………………………. *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*रामनवमीनिमित्त भव्य शोभा यात्रा मिरवणुकीने भिवापूर नगरी दुमदुमली*
……………………………………….
*ढोल ताशाच्या गजरात श्रीरामांचा जयघोष*
………………………………………….
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल
*भिवापूर प्रतिनिधी*:
*राजू सागरे*
भिवापूर: येथील स्थानिक रामनवमी उत्सव मंडळाच्या वतीने दिनांक 6 एप्रिल 2025 रोज रविवारला भिवापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल तथा पोलीस उपनिरीक्षक सुरेखा बिडकर शरद मिरे पत्रकार आदी मान्यवरांच्या हस्ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र , लक्ष्मण, सीता आदि झाकीचे पूजन -अर्चन करण्यात आले आणि प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत नाचत गाजत अतिशय जल्लोषात भिवापूर नगरात ग्रामस्थांच्या दर्शनासाठी सादरीकरण करण्यात आले .
विशेष म्हणजे मी रॅली संग मैदानापासून प्रस्थान करण्यात आले.
मिरवणुकीच्या दरम्यान टी हाऊस चौकात पवन रोकडे यांच्या सौजन्याने सरबत वाटप करण्यात आले, कलारवोडी चौकात कैलास कोमरल्लीवर, शरद मिरे यांच्या सौजन्याने राम भक्तांना अल्पोहार तर लखनजी गुप्ता यांच्याकडून आलू भात तसेच हनुमान मंदिर शिवाजी लेआउट येथे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रावनमीच्या मिरवणुकीत प्रभू रामचंद्र राम भक्त हनुमानजी, राम लक्ष्मण सीता च्या वेगवेगळ्या आकर्षक झाक्या, डीजे व विजेची रोषणाई व आतिषबाजी आदी बाबी रॅलीत दर्शनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते हे येथे उल्लेखनीय.
एकूणच संपूर्ण भिवापूर शहर श्रीरामांच्या गगनभेदी जयघोषाने दुमदुमली होती. यात अनेक तरुण तरुणीने डीजेच्या मधुर संगीतात मनसोक्त आनंद घेत प्रभू रामचंद्र यांना अभिवादन केले .
रामरथ शोभा मिरवणूक यशस्वी करण्यासाठीकरिता विवेक ठाकरे ,शरद मिरे ,विजय लाबकाने ,गिरीश डंबारे, तुषार चिचमलकर, प्रशांत हिंगणे ,रोशन पराते ,गजानन पाटील ,राजू जयस्वाल नरेंद्र हेडाऊ, दिलीप भाऊ गुप्ता, आदींनी अथक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
