भंडारा येथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे 2329 वा जन्मोत्सव पर्व थाटात संपन्न* ………………………………….. *मा. तुलसीराम गेडाम यांच्या नेतृत्वात सम्राट अशोक सेना अखंड भारताचे अभिनव उपक्रम* …………………………………………. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल्स
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*भंडारा येथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे 2329 वा जन्मोत्सव पर्व थाटात संपन्न*
…………………………………..
*मा. तुलसीराम गेडाम यांच्या नेतृत्वात सम्राट अशोक सेना अखंड भारताचे अभिनव उपक्रम*
…………………………………………
*भंडारा प्रतिनिधी*
राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर अखंड भारताला गौरान्वित करणारे अखंड भारताचे निर्माते देवा नाम प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे 2329 व्या जन्मदिनाच्या औचित्य साधून प्रियदर्शी सम्राट अशोक चौक खात रोड भंडारा येथे दिनांक 5 एप्रिल 2025 चैत्र शुक्ल अशोका अष्टमी रोज शनिवारला सायंकाळी 6.30 वाजे सम्राट अशोक सेना अखंड भारताचे संस्थापक ,राष्ट्रीय अध्यक्ष मा. तुलसीराम गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या 2329 वा जन्मदिन थाटात संपन्न झाला.
या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत कुलकर्णी साहेब SDPO भंडारा, माजी नगरसेवक व पत्रकार हिवराज उके तर प्रमुख वक्ता म्हणून प्रीतम प्रियदर्शी डायरेक्टर आवाज इंडिया टीव्ही चॅनल नागपूर, सम्राट अशोक सेनेचे सल्लागार चरणदास मेश्राम ,विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते राजविलास गजभिये , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष महादेव मेश्राम, ओबीसी क्रांती मोर्चा चे अध्यक्ष संजय मते, परमेश्वर वलके, तथा जनता टाइम्स जटा टीव्ही चे मुख्य पत्रकार अर्चना लोखंडे ,उमरेड -भिवापूर तालुका प्रतिनिधी काजल तांबे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पमालेने तथा दीप प्रज्वलित करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तुलसीराम गेडाम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे जीवन चरित्र तथा त्यांचे विश्वव्यापी अमृततुल्य कार्यावर प्रकाश पाडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तथा मोठ्या संख्येने अखिल भारतीय सम्राट अशोक सेना अखंड भारत या सामाजिक संघटनेत सामिल होण्याचे आव्हान केले. या मंगलमय प्रसंगी माननीय तुलसीराम गेडाम यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या उपस्थित कार्यकर्त्यांना डॉक्टर भदंत सावंगी मेधनकर लिखित भारतीय इतिहास के निर्माता सम्राट अशोक नावाचे जीवन चरित्र निशुल्क भेट म्हणून देण्यात आले.
तसेच रोशन जांभुळकर यांनी आपल्या उद्घाटन पर वक्तव्यातून राजा सम्राट अशोकांचे बुद्ध धम्म प्रसाराचे अद्वितीय कार्य अधोरेखित करून त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रीतम प्रियदर्शी चरणदास मेश्राम यांनी सुद्धा आपल्या अमृततुल्य वाणीतून प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मदिन उत्सवाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना प्रेरित करणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप वानखेडे ,सूत्रसंचालन आर. आर. मेश्राम, आभार प्रदर्शन प्रदीप रंगारी तर स्वागत गीत जया शिंगाडे, कल्पना ढोके, छाया मेश्राम, शितल डोंगरे, शांता नेपाले यांच्या चमूने सादर केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चरणदास मेश्राम, दिलीप वानखेडे,सदानंद रंगारी ,यांनी विशेष प्रयत्न केले, तसेच अशोक गायधने, सीमा बडोले, सुरेखा कोटांगले, ज्योत्स्ना गजभिये, अमरकंठ बांडेबुचे, कविता सरादे, दिवाकर मेश्राम, दिलीप चंद्रिकापुरे , अर्चना लोखंडे, काजळ तांबे व सम्राट अशोक सेना भंडारा तथा राज्यातील समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
