*डीजे भीम गीत, जयभीम जयघोषाने भिवापूर नगरी दुमदुमली* ……………………………………… *भिवापूर येथे विविध ठिकाणी भीम जयंती जल्लोष पूर्ण वातावरणात* …………………………………………. *भिवापूर* *उपसंपादक प्रदीप लोखंडे* *जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*डीजे भीम गीत, जयभीम जयघोषाने भिवापूर नगरी दुमदुमली*
………………………………………
*भिवापूर येथे विविध ठिकाणी भीम जयंती जल्लोष पूर्ण वातावरणात*
………………………………………….
*भिवापूर*
*उपसंपादक प्रदीप लोखंडे*
*जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल
विश्वरत्न ,परमपूज्य, बोधिसत्व ,भारतीय घटनेचे शिल्पकार ,थोर इतिहासकार, थोर समाज सुधारक, अर्थतज्ञ, प्रकांड कायदे पंडित, बहुजनांचे कैवारी ,प्रबुद्ध भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या औचित्य साधून भिवापूर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथील भव्य प्रांगणात बसपाचे जिल्हा महासचिव तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. वसंतजी खवास यांच्या शुभ हस्ते आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोज सोमवारला सकाळी 9 वाजे झेंडावंदन करून ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशीला सामूहिकरीत्या ग्रहण करून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले . तसेच बाईक द्वारे भीम रॅलीचे आयोजन करून नागरिकांना फ्रुटी ,बिस्कीट वाटप करण्यात आले .
याप्रसंगी बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष निरंजन धनविजय, सचिन नरसिंह धनविजय ,अर्चना मोटघरे, महादेवजी वाघमारे, शुभम गुटके, राजू पिल्लेवान, रीता मेश्राम आदि कार्यकर्त्यांनी भीम जयंती शांत पूर्ण वातावरणात साजरी करण्यासाठी मौलिक सहकार्य केले.
तसेच आझाद चौक भिवापर येथे सागरे बिछायत केंद्राच्या सौजन्याने सामाजिक कार्यकर्ते राजू सागरे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी जनतेला सरबत वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वाहब मंगेश तिडके, अविगोजे नानवटकर, राजू सागरे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
विशेष म्हणजे कलारवाडी चौकात रांगोळी द्वारे कलाकृतीतून साकारलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनमोहक कौशल्यपूर्ण छायाचित्र प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून बघ्याची एकच तुफान गर्दी उसळली होती. सर्वत्र जयभीम च्या जयघोष गगनभेदी नाऱ्यांनी भिवापूर शहर निनादले होते.येथे देखील उपस्थितांना सरबत वितरण करून महामानवाला कोटी कोटी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने दिलीप गुप्ता, डॉ. अजय अग्रवाल, विनोद उल्लेवार ,सतीश लाडस्कर, रवी गोजे ,राजू सागरे यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कैलास कॉम्रेलीवार यांनी केले.
तसेच येथील बँक ऑफ इंडिया च्या बाजूला भीम जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी वैभव सोरते ,राकेश गेडाम, नितीन दुर्गे, वैभव सुरस्कर, पाचभाई ,मालोदे आधी युवक मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.
या भीम जयंतीच्या पर्वावर जल्लोष पूर्ण वातावरणात अख्या भिवापूर शहरात डीजे च्या भीम गीताच्या सुमधुर संगीतमय वातावरणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य आकर्षक रॅली तरुणाईच्या जोश पूर्ण नृत्याने भिवापूर शहर दुमदुमून गेले होते . अंतिमता रैलीच समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मोटर स्टँड भिवापूर येथे महाप्रसादाचे आयोजन करून करण्यात आले.
याप्रसंगी भीम रॅलीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी स्मारक समितीचे नवजल, लव जनबंधू ,अभिषेक बनसोड ,जांभुळकर ,धनविजय, बनकर आदि भीमसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
