पांजरा येथिल विज वितरण कंपनीचे सब-स्टेशन झाले बेवारीस, लाईनमेन कुंभकरणाच्या झोपेत
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|


पांजरा येथिल विज वितरण कंपनीचे सब-स्टेशन झाले बेवारीस, लाईनमेन कुंभकरणाच्या झोपेत.
महेंद्र नंदागवळी
उपसंपादक, जनता टाइम्स, जटा टिव्ही.
तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील पांजरा येथिल विज वितरण कंपनीचे सब-स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावाला वेळो-वेळी दिवसभरात 1 तासात किमान 2 वेळा 2 मिनिटाचा ब्रेक लाईट बंद करुन दर दिवशी देण्यात येत आहे.
संबंधित विभागाकडून लाईट ट्रिप होत असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रिपचे मुख्य कारण विजचोरी प्रमाण, रोहित्रे तार यांची देखभाल दुरुस्ती न करणे, त्यात येणारे झाडे न कापणे लाईनमेन चे दुर्लक्ष दिसत आहे. या संपूर्ण प्रकाराला लाईनमेन जबाबदार असल्याचे चित्र दिसत आहे.
रात्रीच्या वेळी एकही लाईनमेन सब-स्टेशनला कर्तव्यावर राहत नाही, व मुख्यालई सुद्धा राहत नाही, रात्रीच्यावेळी कार्यालयातून त्यांना फोन करण्यात येतो तेव्हा कॉल सुद्धा उचलण्यात येत नाही, त्यामुळे परिसरातील जनतेला ऐन उन्हाळ्याच्या दिवसात रात्र-रात्री घराच्या बाहेर बसून जागून काढावी लागत आहे. सब-स्टेशन ला नियमित अभियंताही नाही त्यामुळे हे सब-स्टेशन बेवारीस स्थितीत आहे. ट्रिप चे कारण न शोधणारे अश्या कामचुकार लाईनमेन वर कार्यवाही होऊन, मुख्यालयाला न राहता घरभाडा उचलणाऱ्या वर कार्यवाही विभाग करेल का ? तसेच बेवारीस सब-स्टेशन ला कोणी वारीस देण्यात येईल का असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. लाईट वेळो-वेळी ट्रिपमुळे कित्तेक घरघुती उपकरणे खराब होत आहेत.
मुख्य म्हणजे ज्या गावात सब-स्टेशन आहे, ज्यागावातून इतरांना उजेड देण्यात येते तो पांजरा गावच अंधारात राहत आहे. वरिष्ठ कार्यालय, अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





