भरधाव ट्रॅव्हल्स खोल नाल्यात कोसळली*मानोरा परिसरातील घटना* ………………………………………. *नागपूर -भिवापूर रोडवर रस्ता अपघातात 41 प्रवासी जखमी, 8 गंभीर* ………………………………………. *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*भरधाव ट्रॅव्हल्स खोल नाल्यात कोसळली*मानोरा परिसरातील घटना*
……………………………………….
*नागपूर -भिवापूर रोडवर रस्ता अपघातात 41 प्रवासी जखमी, 8 गंभीर*
……………………………………….
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*प्रदीप लोखंडे: उपसंपादक*
*भिवापूर*
चारमोशी वरून भिवापूर मार्गे नागपूरला जाणारी भरधाव प्रवासी ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्गावरील मानोरा फाटा परिसरातील नाल्यात पलटली असल्याची घटना आज दिनांक 24 एप्रिल 2025 रोज बुधवार ला सकाळी दहा वाजेच्या दरम्यान उजेडात आली.
या अपघातात तब्बल 41 प्रवासी जखमी झाले असून यातील 8 प्रवासी गंभीर जखमी झाल्याने नागपूरला उपचारार्थ हलविण्यात आले आहे. सुदैवाने सदर रस्ता अपघातात सध्यातरी कुणाचीही जीवित हानी न झाल्याने अनर्थ टळल्याचे दिसते आहे.
याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक सचिन नरेंद्र धकाते( वय 31 वर्ष) राहणार बामनी ता. नागभीड,, जिल्हा- चंद्रपूर यांच्याविरुद्ध विविध कलमाद्वारे गुन्हा नोंदविण्यात आल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार वाहन क्रमांक.एम. एच. 37 बी. 69 64 या क्रमांकाची श्री बाबा ट्रॅव्हल्स नामक गाडी चारमोसी वरून निघालेली प्रवासी ट्रॅव्हल्स भिवापूर मार्गे नागपूरला प्रवासी घेऊन जात होती. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील मानोरा फाटा परिसरात भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा वाहनावरील ताबा अनियंत्रित झाल्याने 15 फूट खोल असलेल्या नाल्यात ट्रॅव्हल्स कोसळलि.
दरम्यान याच मार्गाने उमरेड कडे जात असलेले माजी आमदार सुधीर पारवे यांना सदर घटना लक्षात येताच अपघात ग्रस्त प्रवाशांना मदतीचा हात देत त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांना घटनेची माहिती देऊन घटनास्थळी योग्य त्या कारवाईसाठी पाचारण करण्यात आले.
यावेळी मात्र ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळल्याने त्यात असलेल्या अपघातग्रस्त प्रवाशांना बाहेर काढताना पोलीस जवानांना फार मोठे तारेवरची कसरत करावी लागली. आणि लागलेच बाहेर काढलेल्या सर्व जखमी प्रवाशांना रुग्णवाहिका (108) तथा काही खाजगी वाहनाद्वारे उमरेड ग्रामीण रुग्णालय तथा भिवापूर ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ हलविण्यात आले.
विशेष म्हणजे सदर घटनेची माहिती परिसरात होताच सदर अपघात बघण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी जमली होती .
रस्ता फारच अरुंद असल्याने या राष्ट्रीय महामार्ग वरील रस्ता अपघातामुळे अपघात स्थळाच्या दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटर लांब पर्यंत वाहतूक प्रभावित झाली होती . युद्ध पातळीवर गाडीत फसलेल्या प्रवाशांना बाहेर काढायचे? की लांबत लांब असलेल्या ट्राफिक मध्ये उभ्या गाड्यांना मार्ग मोकळा करायचा? की जखमी प्रवाशांना उपचारासाठी दवाखान्यात हलवायचं ?असा यक्ष प्रश्न उभा असताना तो सोडवण्यासाठी भिवापूर पोलीस जवानांना फार मोठे दमछाक करावे लागली. त्यातला त्यात भिवापूर पोलीस स्टेशनला मनुष्यबळ कमी असल्याने या दुर्धम्यप्रसंगी जखमी प्रवाशांना बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपस्थित पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. भिवापूर- नागपूर हा अरुंद राष्ट्रीय महामार्ग असल्याने दिवसेंदिवस सदर मार्ग मृत्यू मार्ग ठरत आहे की काय? असं येतील ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी सवाल केला आहे. येथाशिग्र राष्ट्रीय महामार्ग रस्ता रुंदीकरणाकडे शासन प्रशासन तथा स्थानिक प्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालण्याची गरज परिसरामध्ये नागरिकाच्या तोंडून व्यक्त केली जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
