शासकीय जागेतील मामा तलावाच्या पाळीवरचे तब्बल 36 झाडांची अवैध कत्तल, ग्राम पंचायत, वनविभाग, जिल्हा प्रशासनाचा कानाडोळा, मामा तलावाचे रखवालदार निद्रावस्थेत.
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शासकीय जागेतील मामा तलावाच्या पाळीवरचे तब्बल 36 झाडांची अवैध कत्तल, ग्राम पंचायत, वनविभाग, जिल्हा प्रशासनाचा कानाडोळा, मामा तलावाचे रखवालदार निद्रावस्थेत.
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचयात मुरमाडी च्या हद्दीतील शासकीय जागेमधील तब्बल 36 झाडांची अवैध कत्तल करण्यात आली. वन विभागाचे अधिकारी राऊंड ऑफिसर यांना भ्रमणध्वनी द्वारे वृत्त प्रतिनिधींनी अवैध झाडांच्या होत असलेल्या व झालेल्या कत्तली बाबत विचारणा केली असता त्यांनी ह्या बद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले. व वृक्ष कटाईचे परवाना दिला नसून उद्याला आल्यानंतर पाहतो असे बोलले.
त्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्याबाबत माहिती दिली व तुमचे संबंधित क्षेत्रातील राऊंड ऑफिसर आज झाडे कापून वाहुन नेत असतांना उद्या येणार असे बोलले तोपर्यंत इथे काहीही उरणार नाही असे वृत्त प्रतिनिधींनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ध्यानात ही बाब आणून दिली तेव्हा त्यांनी संबंधितांना घटनास्थळी पाठवतो असे सांगितले वृत्त लिहे पर्यंत कोणतेही अधिकारी घटनास्थळी हजर झाले नाही.
मामा तलाव हे जिल्हापरिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त आहे मात्र तेथील अधिकारी यांनी तलाव आमच्या छेत्रात येते परंतु तलावाची पाळीवरचे झाडे आमच्या अधिकार छेत्रात नाही ते वन विभागाच्या अधिनिस्त येतात असे प्रतिनिधींना सांगितले.
झाडे कापुन ट्रॅक्टर मध्ये भरून नेणाऱ्या मजुरांना झाडे कोणी कापले असे विचारले असता त्यांनी सरपंच ने कापले असले बोलले झाडे कापण्याचा व वाहतुकीचा परवाना आहेका विचारला तेव्हा ते पण सरपंच कडे असल्याचे सांगितले.
तेथील ग्रामस्थ सुदाम मेश्राम यांनी गावच्या ग्राम सेवकांना मोबाईल द्वारे फोन करून विचारले तेव्हा त्यांनी माझी प्रकृती तबेत ठीक नाही आणि झाडांचा कत्तली बद्दलपण मला काहीही माहीत नाही असे सांगितले.
ग्रामसेवक यांनी सुद्धा प्रतिनिधींनी केलेल्या कॉल ला उत्तर दिला नाही. काही वेळापूर्वी ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये हजर होते, दिनांक 13/06/2022 ला दुपारी 4:00 वाजता प्रतिनिधी भेटीसाठी गेले तेव्हा ग्राम पंचायत बंद दिसून आली. त्यामुळे त्यांच्यासुद्धा कार्यप्रणाली संशयास्पद दिसून येत आहे.
गावातील एका इसमाने त्याच ठिकाणातील एक झाड कापले तेव्हा 500 रुपये दंड सरपंचकडून करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अवैध वृक्ष कटाईचे लाकूड ज्या ट्रॅक्टर ट्राली ने नेण्यात आले ते सुद्धा विना नंबरचे होते.
एकीकडे शासन झाडे लावा ! झाडे जगवा ! धोरण राबवते तर दुसऱ्या बाजूने ग्रामीण भागात शासन , प्रशासनच नियमबाह्य पद्धतीने झाडे तोडून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मामा तलावाच्या पाळीवरील झाडांचे, एक आठवड्या पासून अवैध वृक्ष कटाई होत होती मात्र एकाही अधिकाऱ्यांच्या ध्यानात ही बाब का बर आली नाही, पंचायत प्रशासनाने सुद्धा याकडे का बरं लक्ष दिले नाही, की चौकीदार ही चोर असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत चर्चेत आहे. झाडे कोणाच्या मालकीची आहेत हे संभ्रम ग्रामवासियात निर्माण झालेला आहे. संबंधित प्रशासनच कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
या सर्व प्रकारावर आता शासन, प्रशासन कोणती कारवाही करते याकडे सर्व मुरमाडी ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space