नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , रामटेक व कन्हान येथिल नवीन एम.आय.डी.सी. बाबत दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे उद्योगमंत्री यांचे विभागाला आदेश – जनता टाइम्स न्यूज

रामटेक व कन्हान येथिल नवीन एम.आय.डी.सी. बाबत दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे उद्योगमंत्री यांचे विभागाला आदेश

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

रामटेक व कन्हान येथिल नवीन एम.आय.डी.सी. बाबत दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे उद्योगमंत्री यांचे विभागाला आदेश


उद्योगमंत्री व आमदार आशिषजी जयस्वाल यांची म.औ.वि.म. यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

आकाश राऊत
प्रतिनिधी ता. पारशिवनी

नागपुर :- १५ सप्टेंबर २०२२ रोजी मा.ना.श्री.उदयजी सामंत उद्योग मंञी यांच्या दालनात रामटेक व कन्हान (ता. पारशिवनी) येथे नवीन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्याबाबत बैठक पार पडली.या बैठकीत प्रधान सचिव, उद्योग विभाग, सह सचिव, उद्योग विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि.म.मुंबई, एम.पटेल प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.म.नागपूर उपस्थित होते.

रामटेक व पारशिवनी तालूक्यात जंगल व्याप्त परिसर असल्यामूळे पूर्वीपासूनच उद्योगांना पुरेसा वाव मिळाला नाही.यामूळे औद्योगिक प्रगती झाली नाही. त्या कारणाने बेरोजगारी, लोकांचे रोजगारासाठी पलायन या सर्व प्रश्नांना तोडगा म्हणून नविन औद्योगिक क्षेञ निर्माण करुन तो विकसित करण्याची नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती. त्याच मागणीला धरुन रामटेक विधानसभा क्षेञाचे आमदार अँड. आशिष जयस्वाल यांनी प्रचंड पाठपुरावा करुन हा प्रश्न शासन दरबारी लावून ठेवला. मागिल सरकारमध्ये सरकारच्या उदासिन धोरणामूळे व अधिकार्‍यांच्या ईच्छाशक्ती अभावी हा प्रश्न प्रलंबित होता.

बेरोजगारी दूर करण्यासाठी व या भागात औद्योगिक प्रगतीसाठी एम.आय.डी.सी. अत्यंत आवश्यक आहे, अशी भूमिका आमदार जयस्वालजी यांनी मांडली व ते पटवून सांगितले शिवाय या भागात मजूर, कोळसा, मंँग्नीज सारखे खनिज व एम.आय.डी.सी. करिता आवश्यक सर्वच बाबी उपलब्ध असल्याचे सांगितले. रामटेक व कन्हान (ता.पारशिवनी) येथे नवीन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्यासाठी उदयजी सामंत यांनी तत्वता मान्याता दिली आहे. दि.१६ सप्टेंबर रोज शुक्रवारला औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारीवर्ग नविन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्यासाठी रामटेक व कन्हान (ता.पारशिवनी) येथिल जागेची पाहणी करण्याकरिता येणार आहे.

मागील शासनाने हा प्रस्ताव थंड बसत्यात टाकला होता व प्रस्ताव अव्यवहारिक असल्याचे सांगितले होते. परंतु आमदार आशिषजी जयस्वाल यांच्या मागणीमुळे मा. उदयजी सामंत, उद्योग मंञी यांनी परत याची शहानिशा करण्यासाठी दोन दिवसात सर्वे करुन संक्षिप्त टिपणी सादर करण्याबाबत प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,मुंबई यांना आदेश दिले आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now