चांदोरी बु. येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
चांदोरी बु. येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- चांदोरी बुज येथे नलिनी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था चांदोरी बूजच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर आज ता. 17 ला पार पाडले. नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. मोतीया बिंदू पेशंट 33 तर चष्मा लागणारे 30 तर अन्य 40 असे 103 लाभार्थीनी शिबिराचा लाभ घेतला.
इंद्राक्षी आय केअर हॉस्पिटल भंडारा नेत्र तपासणी चमू डॉ. दीपक पाठक, प्रदीप क्षीरसागर, येळणे, गायधने, वणवे सिस्टर यांचे उपस्थित निशुल्क नेत्र शिबीर संपन्न झाला.
चांदोरी बुज ते मुंडीकोटा आरोग्य वर्धिनी केंद्राचे अंतर 4 किमी आहे. गावापासून ते मुंडीकोटा पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्डामय झाले आहे. त्यावरून
गावातील वयोवृद्ध व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, पुन्हा एक अपघाताला आमंत्रण होऊन बसले आहे. याचा परिणाम आबाल वृद्ध व्यक्ती व त्यांचेसह जाणाऱ्या बसत होता. बरेच नागरिक डोळ्याच्या त्रासाला सहन करत घरी राहावे लागत होते. त्यामळे समाजिक बांधिलकी जपत नलिनी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेने मोफत नेत्र शिबीराचे आयोजन संस्थापक प्रवीण खेडीकर, अभिजित कावळे, राकेश उपासे यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आले होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space