गोंदिया जिल्ह्यातील चना खरेदी साठी नवेझरी येथिल दि. पांडव सहकारी विपणन आणि भात गिरणी मर्या. नवेझरी तालुका तिरोडा या संस्थेची निवड
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
गोंदिया जिल्ह्यातील चना खरेदी साठी नवेझरी येथिल दि. पांडव सहकारी विपणन आणि भात गिरणी मर्या. नवेझरी तालुका तिरोडा या संस्थेची निवड
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांकरीता दि. पांडव सहकारी विपणन आणि भात गिरणी मर्या. नवेझरी व VCMF च्या संयुक्त विद्यमाने नाफेड द्वारे हमीभाव प्रति क्विंटल 5335/- ₹ दराने संस्थेला शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात चना खरेदीकरीता नवेझरी येथिल संस्थेला रब्बी हंगाम 2022-2023 परवानगी मिळाली आहे.
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या अंतर्गत चना विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी 1) आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, 2) 7/12 ची मूळ प्रत चना लागवट पीक पेरा 2022-2023 च्या उताऱ्यासह व 3) बँक पासबुक ची प्रत संस्थेत जमा करुन ऑनलाईन करुन घ्यावेत असे आव्हाहन संस्थेचे अध्यक्ष तुषार हरडे, यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.
त्याच बरोबर कोणत्याही शेतकऱ्याला अडचण निर्माण होणार नाही, त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे कळविले आहे, अधिक माहिती साठी कुठलीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क करता यावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष तुषार हरडे मो. 9881215307, व्यवस्थापक एन. डी. मेश्राम मो. 9405675895, केंद्र प्रमुख एस. एस. चटोले मो. 801076119, केंद्र प्रमुख डी. एस. गाढवे मो. 7350851677, संगणक परिचालक वाय. एन. घुले मो. 8007566647. यांच्याशी संपर्क करता येईल अशीही तरतूद करण्यात आली.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space