धादरी/उमरी गट ग्राम पंचायतची श्रमदानातून स्वच्छतेकडे वाटचाल, अंगणवाडी मदतनीस वैद्य बाई यांचा सेवानिवृत्ती समारंभ
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
धादरी/उमरी गट ग्राम पंचायतची श्रमदानातून स्वच्छतेकडे वाटचाल, अंगणवाडी मदतनीस वैद्य बाई यांचा सेवानिवृत्ती समारंभ
राकेश बोरकर
तिरोडा तालुका प्रतिनिधी
तिरोडा :- धादरी/उमरी स्वच्छतेतून समृद्धीकडे २ आक्टोंबर २०२२ पासून श्रम दानाच्या माध्यमातून वाटचाल सुरू झाली असून रविवार दि.०२/०४/२०२३ ला सकाळी 6:00 वाजेपासून धादरी येथील अंगणवाडी चा परिसर समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता करण्यात आला.
त्याच बरोबर सन १९९५ पासून अंगणवाडी केंद्रात मदतनीस पदावर कार्यरत असलेल्या नाजुकाबाई वैद्य ह्या ३१ मार्च २०२३ ला सेवानिवृत्ती झाल्यामुळे “स्वच्छ सुंदर- माझे गाव” शहीद संजय श्रमशक्ती समिती धादरी/उमरी च्या वतीने छोट्या खानी सत्कारचे आयोजन करण्यात आले. व त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पातळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला, या प्रसंगी सरपंच अजितकुमार ठवरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून सांगितले की, मदतनीस वैद्य बाईने ३५ वर्षा च्या आपल्या कालकिर्दी मध्ये प्रामाणिक, शिस्तपध्दती ने मोलाचे कार्य केले. लहान मुलांचा सांभाळ करुन त्यांना शिस्तीने घरा पासुन तर अंगणवाडी पर्यंत ने- आन करत असत. लहान बाळा ची आई स्वतःच्या मुलाची काळजी घेत नाही तशी काळजी वैद्य बाईने आपल्या मदतनीस कालकीर्दीत अंगणवाडीतील मुलांची काळजी घेतली. सत्कार मूर्ती वैद्य बाई यांना अंगणवाडीमधून त्यांच्या घरापर्यंत रॅली काढून सोडून देण्यात आले.
या सर्व कार्यक्रमात गावातील होतकरू, सामाजिक कार्यकर्ते व जागृत नागरीक तंटा मुक्ति समितीचे अध्यक्ष श्री.घनश्यामजी रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. रेखलालजी पटले, सर्व श्री. दिगंबरजी पाटील, संतोजी लिल्हारे, डॉ. पटलेजी डॉ. रहांगडालेजी, भास्करजी पटले, पवनजी पटले, शरदजी कापसे, चंद्रसेनजी बागडे, कैलाशजी पटले, रविंद्रजी रहांगडाले, वामनजी उके, संतोषजी भगत , सचिनजी मेश्राम, सचिनजी वैद्य, कविदासजी तुमसरे,(परिचर) बालमित्र रीतीक पटले गावातील ईतर गावकरी उपस्थित होते.
सत्कार समारंभाचे संचालन श्री. राजकुमाजी उके तर आभार प्रदर्शन संदीप उके यांनी केले. सरपंच यांनी रस्त्याच्या कडेला जनावर बांधू नये, खताचे घूडे ठेवु नये, घरासमोरील नाली स्वच्छ ठेवावी. गावातील नागरिकांच्या सहकार्यानेच आपण एक आदर्श, “स्वच्छ सुंदर-माझे गाव” व निरोगी गावाची संकल्पना निर्माण करू शकतो पुढे दिनांक ०७/०४/२०२३ रविवारला सकाळी ०६.०० वाजता वार्ड क्रमांक दोन धादरी येथील सौर ऊर्जा उभारली असलेला परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले आहे. स्वच्छ सुंदर माझे गाव ही संकल्पना मनात घेऊन समोर सुद्धा असेच कार्य सुरूच राहील अशी ग्वाही सरपंच ठवरे यांनी दिली.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space