माजी ग्राम पंचायत सदस्यांना शासन प्रशासनाने बैठकी भत्ता ऐवजी दिला ठेंगा
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
माजी ग्राम पंचायत सदस्यांना शासन प्रशासनाने बैठकी भत्ता ऐवजी दिला ठेंगा
शासन प्रशासनाने घेतले कुंभकरणीय झोपेचे सोंग, महेंद्र भांडारकर प्रहार गोंदिया जिल्हाध्यक्ष यांचा आरोप
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
गोंदिया :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्राम पंचायत सदस्यांचे साकडे
आता तरी देवा मला पावशील का ?
भत्ता कश्याला म्हणतात दावशील का ?
पैसा तो अन्यायचा करी खळबळ
दावी कुणी सदस्याला मारुतीचे बळ
न्यासाठी मदतीला धावशील का ?
भत्ता कश्याला म्हणतात दावशील का ?
दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी आहे त्यांचा खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का
भत्ता कश्याला म्हणतात दावशील का ?
ग्राम पंचायत सदस्यांना बैठकी भत्ता शासन प्रशासनाद्वारे देण्यात येते, मात्र ग्राम पंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होऊन पाच वर्षे लोटून सुद्धा शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणाने सर्व ग्राम पंचायत सदस्यांना भत्ता पासून वंचित राहावे लागले आहे.
मागील पाच वर्षे सदस्यांना बैठकी भत्ता मिळेल अशी चॉकलेट शासन, प्रशासन देत होते. मात्र पाच वर्षे चॉकलेट खाल्ल्या नंतर चॉकलेट सुद्धा संपली व फक्त सदस्यांच्या हातात फक्त ठेंगा उरला अश्या पद्धतीने ठेंगा दाखवण्याचे काम शासनाने केले आहे.
त्या बाबत प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी शासनाला वेळोवेळी ग्रा. पं. सदस्य बैठकी भत्ता मागणीचे निवेदन दिले होते मात्र शासनाला ग्राम पंचायत सदस्यांच्या नावाने साधा घाम सुद्धा फुटला नाही सदस्यांच्या बैठकी भत्याच्या मुद्यावर कुंभकरणीय झोपेचे सोंग शासनाने घेतले आहे अशी प्रखर टीका महेंद्र भांडारकर यांनी केली.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space