बोरडा येथे महिलांना देण्यात आले रोजगाराचे प्रशिक्षण..
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
बोरडा येथे महिलांना देण्यात आले रोजगाराचे प्रशिक्षण..
राजू कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : गट ग्रामपंचायत कार्यालय, बोरडा व जयकिसान प्रशिक्षण संस्था,वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगाच्या उपजीविका तरतुदीअंतर्गत महिलांची कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा बोरडा येथील हनुमान मंदिरात घेण्यात आली.
ग्राम उद्योगाला चालना मिळावी,गावात घरोघरी रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने गावातील महिलांना रोजगार निर्मितीबाबत वेगवेगळ्या प्रशिक्षकांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.महिलांना निरमा पावडर तयार करणे,निम साबण तयार करणे,शेळीपालन योग्य पद्धतीने करणे यासारख्या विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी तुळशीदास राऊत (सरपंच), पंकज चौधरी (उपसरपंच), विष्णू घोडमारे,पौर्णिमा धोटे,इंदूबाई वाहने,जयश्री डडमल (सदस्य), पंजाब चव्हाण (ग्राम विकास अधिकारी), हरीश चोपडे (संस्था सचिव), मनीषा पंधरे (प्रशिक्षक), सुलोचना ठाकूर (प्रशिक्षक) यांच्यासह गावातील ६० प्रशिक्षणार्थी महिला वर्ग उपस्थित होते.प्रशिक्षणाला सकाळी १० वाजता सुरुवात होऊन सायंकाळी ५ वाजता संपन्न झाले.तर सर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space