देशाच्या आरोग्यासाठी दैनंदिन योग सराव करणे आवश्यक – उल्हास इटानकर
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
देशाच्या आरोग्यासाठी दैनंदिन योग सराव करणे आवश्यक – उल्हास इटानकर
राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिनांक 21जून 2024 ला अप्पर तहसील कार्यालयाचे माननीय अप्पर तहसीलदार शेखर पुनसे यांच्या विशेष उपस्थितीत स्वामी विवेकनंदा विद्यालयात योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात योगशिक्षक उल्हास इटानकर यांनी अत्यंत प्रभावीपणे आसन व प्राणायाम व ध्यान कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रम प्रसंगी इटानकर यांनी आसन व प्राणायाम आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे असे प्रतिपादित केले.
त्यांनी तयार केलेली योग पुस्तिका माननीय अप्पर तहसीलदार यांना याप्रसंगी भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक हेमंत जैन, बंटी गुप्ता, पंकज राजपाल उपस्थित होते. कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था इटानकर, साखरवाडे, राऊत, कोडापे, मिश्रा व कावळे यांनी प्राचार्य जयंत देशपांडे व पर्यवेक्षक रेणुका देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space