रामटेक नगर परिषद तर्फे मतदार जनजागृती अभियान
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
रामटेक दिनांक 27.10.24
रामटेक नगर परिषद तर्फे मतदार जनजागृती अभियान
रामटेक : रामटेक विधानसभाचे मुख्य चुनाव अधिकारी व उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन व तहसीलदार रमेश कोळपे यांचा मार्गदर्शन मधे रामटेक नगर परिषद तर्फे 25 ऑक्टोबरला जनजागृती अभियान राबविन्यात आले.
20 नोव्हेंबर 2024 ला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. करिता मतदार जनजागृती अभियान अंतर्गत स्वीप कार्यक्रमाच्या अनुषंगाने रामटेक नगरपरिषद क्षेत्रात मतदार जनजागृती करिता नगर परिषद रामटेक व तहसील कार्यालय रामटेक यांच्या मार्फत रामटेक शहरात संयुक्तपणे बाईक रॅलीचे आयोजन करून मतदार जनजागृत्ती अभियान राबविण्यात आले. मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात नगर परिषद कार्यालय येथून करण्यात आली. तसेच गांधी चौक येथे मतदार शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या बाईक रॅली मध्ये रामजी महाजन देशमुख न.प. विद्यालय, स्व. सदाशिवराव किंमतकर न.प. प्राथमिक शाळा तसेच इतर न.प. शाळेतील शिक्षक वर्ग तसेच शहरातील नागरिक, विविध विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी नितीन लुंगे, मा. तहसीलदार रमेश कोळपे यानी उपस्थित जनसमुदायास मतदार जनजागृती बाबत मार्गदर्शन केले, ते म्हणाले की “मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. या कर्तव्य भावनेने हा प्रयत्न असल्याने यात सर्वांनी सहभागी व्हावे” सर्वांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणूकित मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. या वेळी नगर रचना सहाय्यक देवाश्री उईके , सिटी कॉर्डिनेटर अपेक्षा नाहारकर सहित नगर परिषद मधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्तित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space