राजेंद्र मुळक यांच्या समर्थनार्थ रामटेक विधान सभा क्षेत्रात मतदारात सहानभुती ची लाट
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
राजेंद्र मुळक यांच्या समर्थनार्थ रामटेक विधान सभा क्षेत्रात मतदारात सहानभुती ची लाट.
उबाठाचया विशाल बरबटे ला रामटेक विधानसभेची तिकिट
राजेंद्र मुळक यांच्या भुमिकेकडे मतदारांचे लक्ष.
काँग्रेस कार्यकर्ते आशेवर .
– राजु कापसे, रामटेक
रामटेक विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उबाठा पक्षाच्या वतीने दावा केल्याने तसेच विशाल बरबटे यांना उमेदवारी घोषीत झाल्याने काँग्रेस खेमयात नाराजीच्या सुरु असुन राजेंद्र मुळक यांनाच उमेदवारी मिळावी या करीता काँग्रेस वरिष्ठ नेते मुंबई दिल्ली वारी करुन पक्षश्रेष्ठी ची मनधारणी करणयाचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत . तर दुसरी कडे रामटेक मतदान संघात मुळक यांच्या बाजुने मतदारात मतदारांमध्ये कमालीची सहानुभूतीची लहर पाहायला मिळत आहे.
मागील दहा वर्षापासुन मुळक आमदार नसतानाही रामटेक विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क ठेवत लोककल्याणकारी कामे केल्याने तसेच सतत मतदार क्षेत्रात आरोग्य शिबिर , युवकांना रोजगार ,शाळकरी विद्यार्थी, दिव्यांग, आदिवासींना मदतीच्या हात, महिला आत्मनिर्भर होण्यासाठी रोजगार निर्माण करण्याकरीता साहीतय वाटप व अनेक योजना राबवुन खेड्यापाड्यातील नागरीकांना सहकार्य करण्याचे काम निरंतर केले. त्यामुळे मतदारांच्या त्यांच्यावर अतुट विश्वास निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यात त्यांना यश आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत नवं चैतन्य निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यात मुळांना यश आले .
तर आशिष जैस्वाल यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी घोषित झालयाने आशिष जैस्वाल यांना निवडणुकीत मुळकच बरोबरीची फाईट देउ शकतात.असा कयास मतदार व्यक्त करित आहे. जर मुळकाना उमेदवारी मिळाली नाही तर जैस्वाल विजयी परचम रामटेक क्षेत्रात पूर्णा फडकविणार असे मतदारात उघड उघड चर्चा रंगत आहे. सुनिल केदारा ची सेना, मुळकाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी यांनी लोकसभेत अविस्मरणीय विजय प्राप्त करीत प्रतीकुल परिस्थिती असतानाही बबलु बर्वे चया रुपांत खासदार निवडुन आणला. तर मुळकाचे समाजकार्य आज मुळकाना विजयाच्या जवळ नेत असताना त्यांच्यावर अन्याय होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी पसरताना दिसुन येत आहे.
महाविकास आघाडीकडुन तिकिट मिळो अथवा न मिळो मुळकानी निवडणुकीच्या मैदानात उतरावे विजय आपलाच अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना असुन रामटेकच्या आमदार राजेंद्र मुळक होणार विकासा करीता रामटेक क्षेत्राला मुळकाची गरज असल्याचे सामान्य मतदारांमध्ये बोलले जात आहे .तर सर्वत्र सहानुभूती ची लहर असल्याने मुळक यांच्या फायदा घेतात का? निवडणुकीत अपक्ष लढणार का? या कडे रामटेक विधानसभेतील मतदारांचे लक्ष लागुन आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space