रामटेक दिनांक 16.11.2024 अचल किल्ला स्पर्धा मध्ये अदविक कोहळेच्या जंजीरा प्रथम
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|




रामटेक दिनांक 16.11.2024 अचल किल्ला स्पर्धा मध्ये अदविक कोहळेच्या जंजीरा प्रथम
फोटो: किल्ला स्पर्धा मध्ये उपस्थित स्पर्धक
रामटेक : सृष्टी
सौदर्य बहुउद्देशीय संस्था रामटेक द्वारा 15 नोव्हेंबरला किल्ले स्पर्धाचे आयोजन केले होते. 12 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धा मध्ये चल व अचल असे दोन भाग केले होते. अचलमध्ये घरी तयार केलेले मातीचे किल्ले व चल मध्ये प्रदर्शनीत ठेवलेले किल्ले होते. किल्ले स्पर्धा विषयी बोलताना सृष्टी सौंदर्य परिवारचे ऋषिकेश किंमतकर म्हणाले की रामटेक परिसर निसर्ग व विविधतेने नटलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच स्मरण, त्यांचे आदर्श जुन्या – नवीन पिढीला पुन्हा पुन्हा कळावे ज्यामुळे राष्ट्रबांधणी कार्यात प्रेरणा मिळेल म्हणून
दरवर्षी किल्ला स्पर्धाचे आयोजन केले जाते. अचल मातीच्या किल्हा स्पर्धा मधे अदविक कोहळेच्या जंजीरा प्रथम, सर्वज्ञ येरपुडे व रुगवेद बारोकर द्वितीय, राजन्या किंमतकर व मिराई पब्लीक स्कुल तृतीय क्रमांकवर राहिल्या.
चल किल्ला स्पर्धा मध्ये तृनिका धमगाये व प्रथमेश बांते प्रथम, हिमांसी काठोके व रुद्र वाडीकर द्वितीय, हर्ष कांबळे व सिदेश वाघधरे तृतीय, तारिया शेख व आदित्य बरबटे यांना प्रोत्साहन पुरस्कार मिळाले.
किल्ले स्पर्धा यशस्वी करीता भूषण देशमुख, वेदप्रकाश मोकदम, नंदेश शेळके, रविंद्र नारनवरे, सारंग पंडे, राजेश बाकडे, राजेश किमतकर,
लक्ष्मीकांत तीबुडे सहित आदिनी पर्यत्न केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





