नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , अर्जुनी वैनगंगा नदीच्या पात्रातून दिवसाढवळ्या अवैध उत्खनन तहसीलदार यांच्या पथकाने मौक्यावर पकडले 8 रेती भरले ट्रॅक्टर – जनता टाइम्स न्यूज

अर्जुनी वैनगंगा नदीच्या पात्रातून दिवसाढवळ्या अवैध उत्खनन तहसीलदार यांच्या पथकाने मौक्यावर पकडले 8 रेती भरले ट्रॅक्टर

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

अर्जुनी वैनगंगा नदीच्या पात्रातून दिवसाढवळ्या अवैध उत्खनन तहसीलदार यांच्या पथकाने मौक्यावर पकडले 8 रेती भरले ट्रॅक्टर

👉🏻 माती मिश्रित रेती उपसाच्या नावाने नदी पात्रातूनच अवैध उत्खनन

 

महेंद्र नंदागवळी (उपसंपादक)

जनता टाइम्स, जटा टिव्ही चैनल.

तिरोडा :- माती मिश्रित रेती उपसाच्या च्या नावावर शासनाची दिशाभूल करुन सरळ नदीच्या पात्रातूनच उपसा करुन विक्री केली जात आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

दिनांक 25/06/2025 ला तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून अर्जुनी येथील रेती घाटामधून अवैध उपसा व उत्खनन होत असल्याने तहसीलदार तिरोडा यांच्या पथकाने सकाळी 10:30 वाजता धाड टाकून मौक्यावर सापडलेले वाहन चालक/मालक 1) शुभम अशोक साकुरे ट्रॅक्टर नंबर MH35G6613, 2) अमित इंदल चौधरी MH12AR7917, 3) गौरीशंकर हेमराज राणा, ट्रॅक्टर व ट्राली नंबर नाही, 4) ओमप्रकाश रामचंद देशमुख, MH35AW2587, 5) डी. एच. पटले, ट्रॅक्टर व ट्राली नंबर नाही, 6) महेंद्र ब्रिजलाल राणे MH35AH1453, 7) रामेश्वर देबिलाल रहांगडाले MH35AG7486 सर्व राहणार अर्जुनी, 8) मालक विशाल रामेश्वर मिश्रा रा. अर्जुनी तर चालक जयेंद्र देवगडे सावरा MH35AW3452 असे एकूण 8 वाहन जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केले आहे.

मुख्य म्हणजे त्यात काहींचा ट्रॅक्टर क्रमांक नाही तर सर्वांना ट्राली क्रमांक नाही, प्रत्येक ट्रॅक्टर ट्राली मध्ये 1 ब्रास अवैध नदी पात्रातील रेती आढळून आली.

पथकात नायब तहसीलदार ए.पी.मोहनकर, परसवाडा मंडळ अधिकारी राजेश तांबूलकर, अजय बिसेन, जे. पी. उईके, बी. के. पारधी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक परसवाडा हे होते.

नदीच्या पात्रामधून, नदी घाटातून उपसा करण्याची परवानगी नसतांनाही माती मिश्रित रेती उपसाची परवानगी घेऊन, नदीपात्रातूनच उत्खनन होत असल्याने जिल्हाधिकारी संबंधितावर कार्यवाही करणार का ?

माती मिश्रित रेतीच्या नावावर नदीतूनच अवैध मार्गाने उत्खननासाठी परवानगी देण्यात आली अशी चर्चा व आरोप प्रत्यारोप जनतेने महसूल प्रशासनावर केला आहे.

जप्तीच्या कार्यवाहीने अवैध उत्खनन करणाऱ्या रेती माफियाचे धाबे चांगलेच दानाणले आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

आणखी कथा

You May Have Missed