दोन दिवसापासून सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथिल अनेकांचे घर पडले

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

दोन दिवसापासून सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथिल अनेकांचे घर पडले
👉🏻 शासनाने त्वरीत पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी पिडीत कुठुम्ब व जनतेची मागणी.
साजन बोकडे
(तालुका प्रतिनिधी लाखांदूर)
लाखांदूर :- मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली असुन सतत होत असलेल्या पाऊसामुळे भंडाऱ्या जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यामधील ग्रामपंचायत विरली बु. या गावातील अनेक नागरिकांचे घर पडलेले आहेत. त्यात प्रामुख्याने जनार्दन सिताराम राऊत, मनोज मारोती शेन्डे, वच्छला जगन सावरकररा. विरली बु. यांच्या घरांचे समावेश आहे.
प्रशासन, शासनाने पडलेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी.
तसेच ज्या शेतकऱ्यांचे धानपीक, रोवणी पाण्याखाली डुबलेले त्यांचे सुद्धा पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी पिडीत कुठुम्ब व गावकरी जनतेने शासन, प्रशासनाला केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
